स्वामी विवेकानंद यांचे हे अमूल्य विचार निराशा करणार दूर

आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे...

Updated: Jan 12, 2018, 08:43 AM IST
स्वामी विवेकानंद यांचे हे अमूल्य विचार निराशा करणार दूर title=

मुंबई : आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. आजही त्यांचे विचार आजही गारूड करून आहेत. स्वामी विवेकानंद यांचे हे विचार व्यक्तीची निराशा दूर करु शकतात. त्यांच्या नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. असेच त्यांचे काही विचार खालीलप्रमाणे...

- उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!
 
- ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल.
 
- मी त्या देवाचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी मनुष्य म्हणतात.
 
- शक्‍यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्‍यतेच्या पुढे निघून जायला हवे.
 
- सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.
 
- सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.
 
- तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.
 
- देवाला जर आपण आपल्या अंत:करणात आणि प्रत्येक जिवंत व्यक्तीत शोधू शकलो नाहीत, तर त्याला शोधायला जाणार कोठे?
 
- एक काम करत असताना एकच काम करा. आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा.
 
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.