Christmas 2017 - अशी बनवा DIY ख्रिसमस कार्ड्स

डिसेंबर महिन्यातील यंदाचे पुढील दोन्ही विकेंड म्हणजे सर्वत्र जल्लोषाचे वातावरणाचे असणार आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 20, 2017, 08:29 PM IST
Christmas 2017 - अशी बनवा DIY ख्रिसमस कार्ड्स  title=
Facebook

मुंबई : डिसेंबर महिन्यातील यंदाचे पुढील दोन्ही विकेंड म्हणजे सर्वत्र जल्लोषाचे वातावरणाचे असणार आहे. 
यंदाच्या विकेंडला ख्रिसमस तर पुढील विकेंडला नववर्षाचे सेलिब्रेशन रंगणार आहे.  

ख्रिसमसचं कलरफूल सेलिब्रेशन  

पाश्चात्य देशांइतके आपल्याकडे ख्रिसमसचे खूळ नसले तरीही अनेकजण घरगुती  स्वरूपात किंवा ऑफिसमध्ये ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले जाते. मग यंदा तुमच्या सहकार्‍यांना DIY स्वरूपात तुम्ही स्वतः बनवलेली काही ग्रिटिंग कार्ड्स भेट देऊ शकता . 

मुलांच्या क्रिएटिव्हीला वाव 

तुमच्या मुलांना ख्रिसमसची सुट्टी असेल तर या सुट्टीचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना 
ख्रिसमसची कार्ड बनवायला द्या. या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मुलांच्या क्रिएटीव्हिटीला चालना मिळेल सोबतच त्यांना नवं आणि स्वतः कार्ड बनवल्याचा आनंदही मिळेल.  

मग यंदा हटके स्टाईल्सची ख्रिसमस कार्ड बनवण्याच्या या आयडिया नक्की पहा आणि तुम्ही देखील थोडी क्रिएटीव्हिटी वापरून यामध्ये थोडे बदल करा.  

 

तुमची तयार झालेली यंदाची हटके ख्रिसमस कार्ड्स फोटोच्या स्वरूपात आमच्यापर्यंतही नक्की पोहचवा.