मुंबई : सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय.
या परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ यानं देशात पहिला तर मुंबईच्या पवन गुप्तानं देशात तिसरा क्रमांक मिळवलाय.
उल्लेखनीय म्हणजे, सीए परीक्षेचा एकूण निकाल २२.९८ टक्के लागलाय. ग्रुप १ मधील ४१ हजार ३७३ पैंकी ५७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर ग्रुप २ मध्ये ३८ हजार ४७८ पैंकी ७९२८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.