नवी दिल्ली : सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँकेत ४२८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसर्स या पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधीच आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर आहे. इच्छुकांना अधिक माहिती बँकेच्या recruitment@bankofbaroda.co.in वेबसाईटवर पहायला मिळेल.
स्पेशालिस्ट ऑफिसर्स
५ डिसेंबर २०१७
मार्केटिंग / सेल्स / रिटेलमध्ये स्पेशलायजेशनसोबत २ वर्षांचा फुल टाईम एमबीए कोर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री / डिप्लोमा
एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये आणि इतर मागासवर्गीय, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे
भारतात कुठेही
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार recruitment@bankofbaroda.co.in या साईटवरुन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करताना उमेदवारांना ऑनलाईन पद्दतीने शुल्क भरावं लागणार आहे.
विविध पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवाराची निवड ग्रुप डिस्कशन, मुलाखत आणि एका टेस्टच्या आधारावर करण्यात येणार आहे.