मुंबई विद्यापीठाचा पेपर फुटला, सहा विद्यार्थ्यांची चौकशी

टीवायबीएमएसची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर त्यासंदर्भात सहा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येतेय. मुंबई विद्यापीठाकडून बुधवारी रात्री उशिरा आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Updated: Nov 17, 2017, 05:54 PM IST
मुंबई विद्यापीठाचा पेपर फुटला, सहा विद्यार्थ्यांची चौकशी  title=

मुंबई : टीवायबीएमएसची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर त्यासंदर्भात सहा विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येतेय. मुंबई विद्यापीठाकडून बुधवारी रात्री उशिरा आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

प्रश्नपत्रिका मोबाईलवर

एमव्हीएम महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बीएमएसचा मार्केटींग विषयाची प्रश्नपत्रिका एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवर आढळल्याने त्याबाबत तातडीने मुंबई विद्यापीठाला माहिती देण्यात आली. आता विविध महाविद्यालयांच्या सहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.

सोशल मीडियावरुन प्रश्नपत्रिका व्हायरल

सोशल मीडियावरुन प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. तसंच यात विद्यापीठाचा कर्मचारी आणि महाविद्यालयाचा कर्मचारी सहभागी आहेत का याचाही शोध घेतला जातोय. प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र सोशल मीडियावर नेमके कसे गेले याचा शोध घेणे महत्वाचे आहे. 

नाहीतर गेल्यावर्षी १२ वी बोर्डाच्या तब्बल ५-६ प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला प्रश्नपत्रिकांची सुरक्षा व्यवस्था वाढवावी लागणार आहे.