मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (India Cricket team) चा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने १८ ऑगस्टला त्याचे आंतराष्ट्रीय क्रिकेटचे ११ वर्ष पूर्ण केले. आनंद जाहीर करत त्याने ट्विटरवर ट्विट करत त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाची आठवण जागृत केली. ट्वीटमध्ये कोहलीने लिहिले की, 'मी कधीच विचार केला नव्हता की, देवाचा माझ्यावर एवढा आशीर्वाद असेल'. कोहली सध्या त्याच्या टीम सोबत वेस्टइंडिज दौऱ्यावर आहे.
टीमने तीन मॅचची टी २० सीरीजला ३-० आपल्या नावावर केली. त्यानंतर त्यांनी तीन वनडे मॅचच्या सीरीजला देखील २-० ने जिंकले. या सीरीजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता भारतीय टीम विंडीजच्या विरोधात दोन टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे. त्याचा पहिला सामना २२ ऑगस्टपासून सुरू होईल.
ट्विटरवर आपल्या ११ वर्षाच्या मोठ्या काळाला आठवण करत विराट कोहलीने लिहिले, एका युवकाच्या रुपात आजच्या दिवशी २००८ मध्ये माझा प्रवास सुरू करत आज ११ वर्षांनी, मी कधी विचार केला नव्हता केला की, देवाचा माझ्यावर एवढा आशीर्वाद असेल. तुम्हा सगळ्यांना तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि नेहमी योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळो.
विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ ला दांबुलामध्ये श्रीलंकेच्या विरोधात एकदिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता विराट जगातील उत्कृष्ठ फलंदाज आहे. ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्डस आहेत.
वेस्टइंडीजच्या विरोधात वनडे सीरीजमध्ये विराटने दोन्ही मॅचमध्ये शतक पूर्ण केले. तिसऱ्या मॅचमध्ये शतक पूर्ण करण्यासोबत विराट १० वर्षात सगळ्यात जास्त रन करणारा फलंदाज ठरला. त्याबरोबरच वनडेमध्ये ४३वं शतक बनवत, विराट सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डच्या आणखी जवळ येऊन पोहचला.