मुंबई : पुन्हा एकदा विराट अनुष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र
आता चक्क अनुष्का शर्माच्या प्रवक्ताने या लग्नाचे खंडन केले आहे. त्यांच्या माहितीनुसार, जी चर्चा होत आहे की, विराट - अनुष्का १२ डिसेबंरला इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहे. त्याला त्यांनी नकार दिला आहे.
अशा कोणत्याही पद्धतीचा प्लान विराट आणि अनुष्काचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही जोडी ११ ते १३ डिसेंबर रोजी इटलीला रवाना होणार असल्याची चर्चा होती. तसेच ९ डिसेंबर रोजी या दोघांच्या लग्नाच्या विधी सुरू होणार असल्याचं देखील म्हटलं होतं. कोहलीला श्रीलंके विरूद्ध असणाऱ्या सामन्यात आराम देण्यात आला. आणि या नंतरच लग्नाच्या चर्चांना खऱ्या अर्थाने उधाण आलं.
तसेच या लग्नालं अगदी जवळची मंडळी उपस्थित राहणार होती असं ही सांगण्यात आलं होतं. या दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लान केला होता. हे वेडिंग इटलीमध्ये होणार होतं. अशी चर्चा रंगली होती. सध्या डेस्टिनेशन वेडिंगला खास मागणी आहे.
विराट कोहलीने बीसीसीआयकडे डिसेंबरमध्ये सुट्टीची मागणी केली होती. आणि याच मुद्यावरून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. हे दोघे याच वर्षी डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा अगदी रंगून रंगवल्या जात होत्या. पण अखेर या चर्चांना अनुष्काच्या पीएने पूर्णविराम दिला आहे.