विराट-अनुष्काचे डॉक्टर देखील एकच!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र आहेत. अलीकडेच त्यांची मान्यवर ब्रँडची जाहिरात चांगलीच गाजली. त्यातील त्यांचा अंदाज प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 24, 2017, 03:54 PM IST
विराट-अनुष्काचे डॉक्टर देखील एकच! title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्र आहेत. अलीकडेच त्यांची मान्यवर ब्रँडची जाहिरात चांगलीच गाजली. त्यातील त्यांचा अंदाज प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस उतरला. 
आता यांचे प्रेमसंबंध काही लपून राहिलेले नाहीत. त्यांच्या प्रेमाचे दाखले विराट सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळतात. अलीकडेच विराट आमिर खानसोबत एका चॅट शो मध्ये सहभागी झाला होता. त्यात देखील त्याने अनुष्काबद्दलच्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. 

विराट अनुष्काच्या अनेक गोष्टींवरून त्यांच्यातील प्रेम व्यक्त होते. सध्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातून असे दिसते की दोघेही एकाच डॉक्टरांकडे जातात. हे डॉक्टर अॅक्युप्रेशर स्पेशालिस्ट आहेत. 

या डॉक्टरांसोबतचा अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डॉक्टरांचे नाव ज्वेल गमाडिया असे आहे. डॉ. ज्वेल यांनी विराट आणि अनुष्कासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्काने विराटला डॉ. ज्वेल यांच्याकडून उपचार करण्याचे सुचविले. 

अनुष्काचा फोटो शेअर करण्यापूर्वी याच डॉक्टरांसोबतचा फोटो विराटने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना विराटने पोस्टमध्ये लिहिले की, एक चांगला मित्र असण्याबरोबर तुम्ही एक चांगले ज्ञानी माणूस आहात. मी अशा अनेक लोकांना ओळखतो ज्यांनी तुमच्याकडून खूप काही शिकले आहे. देवाची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहो ज्वेल."

 

Glad could help

A post shared by dr.jewel gamadia (@dr.jewelgamadia) on

डॉ. ज्वेल हे फक्त विराट आणि अनुष्का यांच्यावर उपचार करत नाहीत तर कटरीना कैफ, जॅकलिन फर्नांडिस यांसारखे अनेक सेलिब्रिटी यांच्याकडून उपचार घेतात.