पाकिस्तान : विराट कोहली, सचिन तेंडूलकर, लसिथ मलिंगानंतर आता जसप्रीत बुमराहसारखी दिसणारी एक व्यक्ती पाकिस्तानामध्ये दिसली आहे.
३ मार्च २००९ साली झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये श्रीलंकन खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर पाकिस्तानामध्ये जाण्यास आणि तेथे आंतरराष्ट्रीय दौरा करण्यास अनेक खेळाडूंनी नकार दिला होता.
तब्बल ८ वर्षांनंतर आईसीसी च्या वर्ल्ड इलेवन टीमने लाहोरमध्ये ३ सामन्यांची टी-20 सीरीजचे आयोजन केले आहे. या सिरीजच्या खेळादरम्यान जसप्रीत बुमराहसारखी व्यक्ती प्रेक्षकांमध्ये आढळली.
एका फेसबुकपेजवर जसप्रीत बुमराह सारख्या दिसणार्या व्यक्तीचा फोटो पोस्ट करताना त्यावर खास कॅप्शन लिहण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी 'Just Pakistani Things'या फेसबुक पेजवर शाहिद-ए-मिल्लत या पिझ्झा आऊटलेटमध्ये काम करणारी आणि विराट कोहली सारख्या दिसणार्या एका व्यक्तीचा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.