सिडनी टेस्टनंतर David Warner ने मागितली Mohammed Siraj ची माफी

 डेव्हीड वॉर्नरने भारतीय खेळाडू मोहम्मद सिराजची माफी मागितली

Updated: Jan 12, 2021, 03:11 PM IST
सिडनी टेस्टनंतर David Warner ने  मागितली Mohammed Siraj ची माफी title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॅट्समन डेव्हीड वॉर्नर (David Warner) ने भारतीय खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)ची माफी मागितलीय. तिसऱ्या टेस्ट दरम्यान प्रेक्षकांकडून झालेल्या जातीयवादी विधानाबद्दल त्याने माफी मागितली. दर्शकांना असं करायला नको होतं असं तो म्हणाला. पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या सिराज (Mohammed Siraj) व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)ला देखील जातीयवादी विधानांचा सामना करावा लागला. वॉर्नरने इंस्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट लिहीली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by David Warner (@davidwarner31)

मी, मोहम्मद सिराज आणि भारतीय टीमची माफी मागतो. जातीयवादी आणि गैरव्यवहार कधीच स्वीकारार्ह नाही. प्रेक्षक यापुढे असं करणार नाहीत अशी आशा करतो असं त्याने पोस्टमध्ये म्हटलंय.

दुखापतग्रस्त असल्याने वॉर्नर पहिल्या दोन मॅचला मुकला होता. परतल्यावर आनंद झाल्याचे तो म्हणाला. मॅचचा रिझल्ट हवा तसा नाही लागला पण हे टेस्ट क्रिकेट आहे. पाच दिवस आम्ही चांगले खेळलो. पण भारताने चांगला कमबॅक घेतला. हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही क्रिकेटवर प्रेम करतो. हा सोपा खेळ नाहीय. आता ब्रिसबॅनमधील निर्णायक मॅचवर आमचे लक्ष आहे. तिथे खेळण्याची मज्जाच वेगळी असल्याचे तो म्हणाला.