भारताने ऑस्ट्रेलियाला २६ रन्सने हरविले

 भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान ठेवले होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 17, 2017, 10:15 PM IST
भारताने ऑस्ट्रेलियाला २६ रन्सने हरविले title=

चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात यजमान भारताने ऑस्ट्रेलियाला  रन्सने धूळ चारली आहे. भारताच्या बॅटिंगची सुरूवात अडखळत झाली तरी हार्दिक पांड्या आणि एम.एस धोनीच्या तडाखेबाज खेळीमूळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर २८२ रन्सचे आव्हान ठेवले होते. भारताने हा सामना २६ रन्सने जिंकला.
पावसाने व्यत्यय आणल्याने ऑस्ट्रेलियासमोर २१ ओव्हरमध्ये १६४ रन्स करण्याचे आव्हान होते. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक, अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन बॅट्समन तग धरु शकले नाहीत. 
सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने २५ रन्स केले. दरम्यान ऑस्ट्रेलियाची बॅटींग ऑर्डर झपाट्याने कोसळत गेली. कॅटराईट आणि कॅप्टन स्टेवन स्मिथ १-१ रन्स करुन तंबूत परतले. मॅक्सवेलने ३९ रन्स केले. ऑस्ट्रेलियाचा इतर कोणताही चमकदार कामगिरी करु शकला नाही.