Ruturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण

Ruturaj Gaikwad Birthday : अनेक दिवसांपासून सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सायलीने म्हणाली, या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. त्यातच ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्ताने सायलीचा फोटो पुन्हा चर्चेत आला आहे. 

Updated: Jan 31, 2023, 04:17 PM IST
Ruturaj Gaikwad Birthday: तो कायम सायलीसोबत...; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण title=

Sayali Sanjeev-Ruturaj Gaikwad Affairs : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev). आज सायली ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सायली संजीवचे नाव हे भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाडशी (Ruturaj Gaikwad) जोडले जात होते. त्यानंतर स्वत: सायलीने यावर प्रतिक्रिया दिली होती. मात्र आज पुन्हा एका व्हायरल फोटोमुळे सायली आणि ऋतुराज गायकवाड सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. 

भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आज (31 जानेवारी 2023) त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjiv) ने सोशल मीडियावर केक कापतानाचा फोटो Insta वर शेअर केला आहे. यानंतर सायलीने ऋतुराजचा वाढदिवस साजरा केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर सायलीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

वाचा: अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग? 35 वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता 

मात्र सायली संजीव एका मुलाखतीमध्ये तिने ऋतुराज गायकवाडसोबतच्या (Ruturaj Gaikwad) अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य दिले होते की, “आमच्यात काहीच सुरू नाही. या अफवांमुळे आमच्यात जी मैत्री होती ती सुद्धा संपली आहे. मित्र म्हणून आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही. आमच्यात काहीच नव्हते. आमचे एकमेकांशी नाते का जोडले जात आहे हेही मला ठाऊक नाही” असे सायली म्हणाली. त्यानंतर एका फोटो नंतर सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड पुन्हा चर्चेत आले. 

विशेष म्हणजे आज अभिनेत्री सायली संजीवचाही (Happy Birthday Sayali Sanjeev ) वाढदिवस आहे. अशात तिने केक कट करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. त्यानंतर सायलीने ऋतुराजच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले आहे, अशा चर्चा सोशल मीडियावर चांगल्या रंगल्या आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सायली आणि ऋतुराज यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहे. 

वडिलांच्या निधनानंतर सायलीची भावनिक पोस्ट  

वडिलांच्या निधनानंतर सायली संजीवने इन्स्टा पोस्टमध्ये आपल्या लाडक्या बाबासोबतचे अनेक पोस्ट शेअर केले आहेत. आजही ती तिच्या वाढदिवासानिमित्त बाबा I’m missing you असं म्हणत तिने इन्टावर केक कापत फोटो शेअर केले आहेत. 

काय आहे प्रकरण?

सायली संजवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोवर ऋतुराजने कमेंट केली होती. त्यावेळी आयपीएल सुरु होती. सायलीने हार्ट इमोजींचा वापर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.