दक्षता ठसाळे - घोसाळकर

-

'बिग बॉस मराठी'चा पहिला एपिसोड या दिवशी

'बिग बॉस मराठी'चा पहिला एपिसोड या दिवशी

रिअॅलिटी शोमध्ये हिट ठरलेला बिग बॉस शो आता मराठीत येत आहे. या शोला सुरूवातीपासून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा शो कोण होस्ट करणार याची चर्चा रंगली असताना ते नाव घोषित करण्यात आलं. निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर मराठी 'बिग बॉस'चे होस्ट होणार आहेत. हिंदी 'बिग बॉस' चा होस्ट सलमान खान लोकांचा फेवरेट आहे, महेश मांजरेकरांना ही लोकप्रियता मिळते का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे. 

भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं 'आय लव्ह यू' गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?

भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं 'आय लव्ह यू' गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?

क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी 'मेरे रश्के कमर' या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव 'आय लव्ह यू' या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे. 

'या' ट्रॅफिक पोलिसाची सोशल मीडियावर होतेय चर्चा

'या' ट्रॅफिक पोलिसाची सोशल मीडियावर होतेय चर्चा

पोलीस म्हटलं की समोर येतो तो त्यांचा खाकी पेशा. त्या पेशात एक कणखर, निगरगठ्ठ माणूस राहतो अशी समज असते. पण ही समज खोडून टाकणारी गोष्ट समोर आली आहे. सोमवारी एक असा प्रकार घडला की, ज्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकी वेशात असलेलं भावनिक मन समोर आलं आहे. सध्या ट्रॅफिक पोलिसाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ICICI बँकेने केली फक्त एक चूक, 16 हजार करोड रुपये बुडले

ICICI बँकेने केली फक्त एक चूक, 16 हजार करोड रुपये बुडले

बँकिंग सेक्टरचे वाईट दिवस कधी संपणार काय माहित? गेल्या दीड महिन्यापासून बँकिंग सेक्टरची अवस्था खूप बीकट आहे. आरबीआयच्या नियमांना घेऊन बँका गंभीर नसल्याच समोर येत आहे. पीएनबी बँके्या पाठोपाठ अनेक घोटाळे समोर येत आहे. आता आयसीआयसीआय बँक देखील गेल्या काही दिवसांपासून 3250 करोड रुपयांच्या 'स्वीट डील'च्या प्रश्नात अडकली आहे. आता बँकेचे एमडी चंदा कोचर यांच नाव बदनाम करण्याचा प्रयत्न आहे की ही खरंच धोक्याची घंटा आहे ते मात्र अद्याप कळत नाही. आता अशी माहिती समोर येते की बँकेचे 16 हजार करोड रुपये बुडाले आहेत. 

उषा नाडकर्णी करणार बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री

उषा नाडकर्णी करणार बिग बॉस मराठीमध्ये धमाकेदार एन्ट्री

बिग बॉस हा शो तसा सगळ्यांच्याच आवडीचा. आता हा शो मराठीत येऊ घातला आहे. दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेले महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉसचे आतापर्यंतचे सर्व सिझन हीट ठरले आहेत. त्यामुळे आता मराठीतील बिग बॉस देखील पाहण्यासारखा असणार आहे. आणि यामध्ये उषा नाडकर्णी असणार तर ते नक्कीच लोकप्रिय ठरणार आहेत. 

Pitbull कुत्र्याच्या हल्यात 3 जण जखमी, पाहा व्हिडिओ

Pitbull कुत्र्याच्या हल्यात 3 जण जखमी, पाहा व्हिडिओ

कुत्र्यांच्या हल्यात नवी दिल्लीतील उत्तम नगरमधील3 व्यक्ती जखमी झाले आहे. पिट बूल कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलाचा देखील समावेश आहे. 28 मार्च रोजी या पिट बूल कुत्र्याने हल्ला केला असून हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या हल्यात कुत्र्याने एका लहान मुलाला बराच काळ धरून ठेवलं. 

प्रेमातील शारीरिक संबंध 'बलात्कार नाही' - हायकोर्ट

प्रेमातील शारीरिक संबंध 'बलात्कार नाही' - हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रेमातील शारिरीक संबंध हे बलात्कार नसल्याचे म्हटले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीयुगुलातील शारिरीक संबंध हा कधीच बलात्कार समजला जाणार नाही. दोघांच्या सहमतीने आलेली ही जवळीक बलात्कार नसल्याच हायकोर्टाने म्हटलं आहे. 

ओवैसींनी मुलीच्या साखरपुड्याला केला एवढा खर्च, सोशल मीडियावरून टीका

ओवैसींनी मुलीच्या साखरपुड्याला केला एवढा खर्च, सोशल मीडियावरून टीका

मुसलमानांचे प्रश्न दिवस - रात्र मांडणारे खासदार असुद्दीन यांच्यावर सोशल मीडियातून सडेतोड टीका होत आहे. ओवैसी कायम गरिबांच्या प्रश्नांवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. मात्र त्यांनी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातून श्रीमंतीचे दर्शन घडवले. आणि याच गोष्टीवरून त्यांच्यावर टीका होत आहे. 

अक्षय कुमार स्टाईलसाठी यांना करतो फॉलो

अक्षय कुमार स्टाईलसाठी यांना करतो फॉलो

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं असं म्हणणं आहे की, त्याने आपल्या या सिनेमाच्या करिअरमध्ये हॉलिवूडच्या कलाकारांना पाहून आपली स्टाइल स्टेटमेंट तयार केली. त्यांना पाहून अक्षयकडे स्टाईलची एक समझ आली. 

VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'

VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'

महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती.