VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'

महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती. 

Dakshata Thasale Updated: Apr 2, 2018, 10:03 AM IST
VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'  title=

मुंबई : महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती. 

खरं म्हणजे धोनीच्या या षटकारानंतर भारताचं नाव विश्वकपच्या यादीत सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. धोनीच्या या षटकारामुळे भारतीय संघ दुसऱ्यांदा विश्वकपच्या यादीत सहभागी झाला होता. 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड सामन्यात श्रीलंका - भारत संघ वानखेडेच्या मैदानात एकमेकांच्या समोर उभे होते. हा सामना 2 एप्रिल 2011 रोजी खेळला गेला. उप महाद्वीपचे दोन्ही संघ फायनल एकमेकांविरूद्ध खेळत असल्याचे पहिल्यांदा होत होते. भारताने फक्त कागदावरच नाही तर मैदानावर देखील आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. 

विकेटकीपर कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ फायनलमध्ये विकेट कीपर कॅप्टन कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला 6 विकेटने हरवून तब्बल 28 वर्षानंतर दुसऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वकप 2011 जिंकला होता. 2011 च्या विश्वकप फायनल सामन्यात भारताने इतिहास रचला. 11 चेंडूत 4 धावांची गरज होती. त्यावेळी कॅप्टन महेंद्र सिंह मैदानावर होता. त्यावेळी बहुदा धोनीच्या डोक्यात हेच सुरू असेल की, एकदाच षटकार लगावून एकाच वेळी सर्व सामना हातात घेऊ.