Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या

Pandharpur Wari 2023 Special Train : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर असते. पंढरपुरात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 18, 2023, 03:00 PM IST
Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या  title=
Pandharpur Ashadhi Ekadashi Special Trains

Pandharpur Wari 2023 Special Train News In Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. विठ्ठल भेटीची आस घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष 76 रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा आषाढी एकादशी 29 जून रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला जात असतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून 23 जून ते 3 जुलै या कालावधीत रेल्वेच्या 76 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष रेल्वेचे वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध केले असून तुम्हीही हे वेळापत्रक जाणून घेऊ शकता.

पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या नागपूरहून मिरज, नागपूर-पंढरपूर यासह नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो भाविकांची सोय होणार आहे. 

नागपूर - पंढरपूर स्पेशल : ही ट्रेन क्रमांक 01207 नागपूरहून 26 जून आणि 29 जून 2023 रोजी सकाळी 8.50 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी पंढरपुरला पोहोचेल.  तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून 1208 विशेष क्रमांकाची गाडी 27 आणि 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. 

या गाडीला एक सेकंड वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 स्लीपर क्लास आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे. 
 या स्थानकांवर थांबणार- अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबते.

नवीन अमरावती - पंढरपूर स्पेशल : नवीन अमरावती येथून गाडी क्रमांक 01119 विशेष 25 आणि 28 जून रोजी दुपारी 2:40 वाजता पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:10 वाजता पंढरपुरला पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून गाडी क्रमांक 01120 विशेष गाडी 26 व 29 जून रोजी रात्री 7.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता नवीन अमरावती स्थानकात पोहोचेल.

या स्थानकात थांबणार - बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी स्थानकवार थांबेल. या ट्रेनला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 स्लीपर कोच, सात सामान्य द्वितीय श्रेणी किंवा दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन असतील.