मुंबई: भारतात आसूस ने लॅान्च केला नवीन स्मार्टफोन. या आधी आसूसने २०१८मध्ये गेमिंग ब्रॅण्ड रिपब्लिक ऑफ गेमर्सने याची घोषणा केली होती. हा जगातील पहिला 3D कुलिंग सिस्टमचा स्मार्टफोन ठरणार आहे. या स्मार्टफोनची विशेषता आहे की, या फोनमध्ये एअरट्रिगर टच सेन्सर ए.एम.ओ एलईडी डिस्प्ले, ९०Hz रिफ्रेश रेट आणि क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि अॅडरेनो ६३० जीपीयू यांचा समावेश केला आहे.
८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजमधील स्मार्टफोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. हे फ्लिपकार्ट येथे विकले जाईल. ऑफर्सविषयी म्हंटलं तर, आपण ९९९ रुपये देऊन मोफत मोबाईल संरक्षण योजना घेऊ शकतो.
आसूस ROG फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम अॅन्ड्रॅाईड ८.१ ओरीयोवर अधारीत गेंमिग यूआय दिलं गेल आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये ड्युल कॅमेरा असणार आहे. यात प्राईमरी सेंसर १२ MP आणि सेकंडरी सेंसर ८ MP दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ MPचा कॅमेरा देण्यात आहे.
कनेक्टिव्हिटी विषयी चर्चा केली तर याफोन मध्ये वाय-फाय ८०२.११ए/बी/जी/एन/एसी/एडी, ब्लूटूथ ५.०, एजीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, एनएफसी आणि ३.५ एमएम जॅकचा समावेश आहे. अॅक्सेलेरोमीटर, एन्बीएन्ट लाईट सेन्सर, कंपास, जायरोस्कोप, प्रॉक्झिमिटी सेन्सर आणि अल्ट्रासोनकि एअरट्रिगर सेन्सर याचा भाग आहे.स्मार्टफोन ची बॅटरी क्षमता ४०००mAh आहे .आसुस ROG स्मार्टफोनचा व्हिडीओ पाहा
Prepare yourself for the most revolutionary gaming experience in a smartphone! The #GameChanger is here! Watch the ROG Phone launch event here: https://t.co/y9bIKIVhhK
— ASUS India (@ASUSIndia) November 29, 2018