तरुणाचा असा जुगाड क्षणात बाईकची झाली कार... कसं? पाहा व्हायरल व्हिडीओ

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे कसं शक्य आहे? तर यासाठी तुम्ही हा व्हिडीओ पाहा

Updated: Jul 7, 2022, 08:15 PM IST
तरुणाचा असा जुगाड क्षणात बाईकची झाली कार... कसं? पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर देसी जुगाडचा एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरंतर आपल्याला सोशल मीडियावर असे अनेक जुगाडाचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्याला कशाचीच तोड नसते. हा जुगाड देखील तसाच आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला शब्दच सुचणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण स्कूटी चालवत आहे. परंतु तो त्याची ही दुचाकी कार प्रमाणे चालवत आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं तो त्याची स्कुटी ही एखाद्या कार प्रमाणे चालवत आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे कसं शक्य आहे? तर यासाठी तुम्ही हा व्हिडीओ पाहाच

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यामध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणाने दुचाकीला खाल कार सारखा एक्सलेटर लावला आहे. जो पायाने दाबल्यामुळे गाडी स्पीड पकडते आणि धावू लागते. या तरुणाने आपल्या बुद्धीचा पुरेपुर वापर करुन हा जुगाड केला आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

तरुणाचा हा एक्प्रिमेंट कितपत यशस्वी होईल हे माहीत नाही, परंतु लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे हे मात्र नक्की.

व्हिडीओ कुठला आहे हे कळलेलं नाही, परंतु तो भारतातील असा अंदाज बांधला जात आहे. 

आतापर्यंत 48 हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.