प्लास्टिक नष्ट करणाऱ्या किड्याबाबत तुम्हाला माहितीये?

प्लास्टिक कचरा नष्ट कसा करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न जगासमोर आहे. 

Updated: Jul 12, 2021, 10:21 PM IST
प्लास्टिक नष्ट करणाऱ्या किड्याबाबत तुम्हाला माहितीये?  title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे देशाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सरकारकडून प्लास्टीकचा वापर न करता कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर करावा, असं आवाहन केलं जातं. पण या आवाहनला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जाते. प्लास्टिक विघटनासाठी किती तरी वर्षांचा काळ जावा लागतो. प्लास्टिक ही खुप मोठी गंभीर समस्या आहे. जगात पृथ्वीवर कोणती गोष्ट टिकत असेल तर ते म्हणजे प्लास्टिक. मुळशी पैटर्न चित्रपटामधला डायलॅाग पाहिलाच असेल कलाकार ओम भुतकर आणि उपेंद्र लिमये यांचा संवाद 

ओम भुतकर - प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब…

उपेंद्र लिमये - पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकत..

ओम भुतकर - मगं मी प्लास्टिक आहे समजा…

डायलॅाग टाकण्यामागील हेतू इतकाच की पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकत दुसरं काही नाही.  देशभरात दरवर्षी तब्बल 500 करोड प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. समुद्रात तर दर वर्षी 80 लाख टन प्लास्टिकचा कचरा आढळतो. भारत सरकारच्या पर्यावरण,वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयच्या म्हणण्यानुसार तब्बल 26 हजार टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती होते.

प्लास्टिक कचरा नष्ट कसा करायचा, हा सर्वात मोठा प्रश्न जगासमोर आहे. यावर अनेक प्रकारचे प्रयत्न देखील चालू आहेत. तुम्ही विचार करु शकता की माणसांसाठी प्लास्टिक कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे. प्लास्टिक नष्ट करणे हे काम खुप अवघड असलं तरी यांवर एक चांगला पर्याय सापडला आहे ते म्हणजे किडा

होय किडाच. प्लास्टिक नष्ट करण्यासाठी किडा  चांगल्या प्रकारे काम करु शकतो. हो खरयं तुम्ही बरोबर वाचलात. आम्ही किड्यान बद्दलच बोलतोय. पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक दोन प्रकारामध्ये विभागलं जाऊ शकतं, ज्यात एक म्हणजे प्लास्टिकची रिसायकलिंग केली जाऊ शकते तर पर्याय दोन म्हणजे ज्यांची रिसायकलिंग केली जाऊ शकत नाही. प्लास्टिक कचरा रिसाइकलिंग न होणाऱ्या कचऱ्याचा विषय संपुर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनत चाला आहे. 

प्लास्टिकचे उत्पादनांपैकी काही उत्पादनांचा वापर आपण एकदाच करु शकतो.त्यानंतर फेकून देतो.

ज्या प्लास्टिक कचऱ्याला आपण नष्ट करु शकत नाही, त्या प्लास्टिकला किडा मुक्त करेल. हा किडा ॲानलाईन विकला जातोय, तुम्ही विकत घेणार का ? किडा फक्त
प्लास्टिक खात नाही तर तो पचवतो देखील.

आश्चर्यकारक असतो हा मीलवॉर्म किडा..

प्लास्टिक कचरा नष्ट करणारा किडा आहे मीलवॉर्म. हा किडा प्लास्टिक नष्ट न होणाऱ्या गोष्टी खावून टाकतो तसेच ते पचवतो देखील. हा किडा पर्यावरणाचं रक्षण करु शकतो. असंख्य प्राण्यांचे जीव वाचवू शकतो. आणि प्लास्टिक जाळण्यासारख्या प्रक्रियातून हा किडा मुक्ती देऊ शकतो. प्लास्टिक जेव्हा आलं होत, तेव्हा हा किडा आपल्यासाठी आश्चर्यकारक गोष्ट होती.

किड्याच्या भूमिकाबद्दल कसं माहिती झालं ?

डॉयचे वेलेच्या रिपोर्टनुसार,  2017  मध्ये प्रसिद्ध बायोलॉजिस्ट फेडेरिका बतोंचिनी यांनी ही गोष्ट शोधली, की मधुमाशीचा पोळ साफ करताना त्यांना हा किडा दिसला.त्यांनी याला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं. प्लास्टिकच्या पिशवीत प्रत्येक वेळी किडे हे मरुन जायचे. पण यावेळी प्लास्टिक चावून हा किडा बाहेर आला. किडा बाहेर आला ही गोष्ट खुप आश्चर्यकारक होती. तेव्हापासून प्लास्टिक कचरा संपवण्यासाठी मिल वॉर्मची माहिती मिळाली.

ॲानलाईन विकत मिळतो हा किडा !

मीलवॉर्मच्या प्लास्टिक नष्ट करण्याचं काम जरी नंतर माहिती झालं असलं तरी, या किड्यांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कोंबडी किंवा इतर पक्षीच्या खादयासाठी, माशांना पकडण्यासाठी त्यांना खावू घातलं जातं. मुख्य म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की या किड्याची विक्री अॅमेझॉन,फ्लिपकार्ट सारख्या ई- कॉमर्स साइटवर सुद्धा यांची विक्री केली जाते.

किडा नाही तर जिवाणू नष्ट करतात प्लास्टिक !

प्लास्टिक नष्ट करणार हा किडा नव्हे, तर त्यांच्या आत मध्ये असणारा जिवाणू आहे. सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य निर्माण करतो. आपण पाहिलचं की कचऱ्यामध्ये मिळणाऱ्या प्लास्टिक वर कसे हे किडे भरभराट करतात आणि त्यांना खाऊन टाकतात.