तालिबान्यांचा महिलांवर लैंगिक अत्याचार; 'या' पॉर्न स्टारने सांगितली आपबीती

 अफगाणिस्तानची पॉर्न स्टार यास्मिना अलीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. तालिबानच्या राजवटीत त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे

Updated: Feb 17, 2022, 04:19 PM IST
तालिबान्यांचा महिलांवर लैंगिक अत्याचार; 'या' पॉर्न स्टारने सांगितली आपबीती title=

नवी दिल्ली : अफगाणिस्तानची पॉर्न स्टार यास्मिना अलीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. तालिबानच्या राजवटीत त्यांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. महिलांवर खूप बंधनं आली आणि त्यांच्या शरिरावर तालिबानने हक्क सांगितला होता असं तिने म्हटलंय.

प्रसिद्ध पॉर्न स्टार यास्मिना अलीने ब्रिटीश वृत्तपत्र डेली स्टारशी बोलताना तिच्या आयुष्यातील कटू सत्य सांगितले. 1990 च्या दहाव्या दिवशी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. यास्मिना अली त्यावेळी लहान होती. यास्मिनाकडे स्वतःचे घर नव्हते.

अशी बनली पॉर्न स्टार

तालिबानच्याच्या अत्याचारामुळे लोकं अफगानिस्तान सोडत होते. यास्मिना नशीबवान होती. कारण तेथून ती पळ काढण्यात यशस्वी झाली. यास्मिना ब्रिटनमध्ये गेली. तेथे तिने परिस्थितीमुळे पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवले.

यास्मिना अलीच्या म्हणण्यानुसार, "माझ्या वेबसाईटवरून तालिबानी माझी माहिती मिळवायचे. ते माझा तिरस्कार करीत होते. कारण त्यांना अफगाणिस्तानची पॉर्न हब म्हणून ओळख होऊ द्यायची नव्हती.  मी माझे शरीर दाखवते याचा तालिबान्यांना राग होता. त्यांचे म्हणणे होते की, ते (तालिबानी) माझ्या शऱीराचे मालक आहेत. आणि मला माझे शरीर कोणालाही दाखवण्याचा अधिकार नाही. जर मी तालिबान्याचे म्हणणे ऐकले तर मी खरी अफगान आहे असे त्यांचे म्हणणे होते.

तालिबानीही माझा व्हिडिओ पाहायचे


यास्मिना अलीने म्हटले की, मी एक अफगान आहे. आणि तालिबानी लोकं माझा व्हिडिओ पाहायचे. अफगान पॉर्न सर्च केल्यावर माझे नाव सर्वात आधी येत असे याचे कधी मला आश्चर्य वाटत नव्हते.

सत्तेत बसलेले लोकं करतात अत्याचार


यास्मिनाने म्हटले की, तालिबानचे लोकं धार्मिक पोषाख परिधान न केल्यास त्यांना जबर मारहाण करीत असे. त्यांच्याबाबत तुम्ही कोठेच तक्रार करू शकत नाही. कारण सत्तेत बसलेले लोकंच अत्यारात सामिल आहेत.

महिला शिक्षणापासून वंचित

यास्मिना जेव्हा 9 वर्षाची होती तेव्हा ती अफगानिस्तानात राहत होती. तेव्हा त्यांना शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता. तालिबानचे लोक महिलांना शिक्षण देण्यास घाबरतात. सुशिक्षित महिलांना ते घाबरतात. असं तिने सांगितले. 
तालिबान्यांनी सर्व नियम फक्त पुरूषांचा फायदा आणि आनंदासाठी बनवले आहे. महिलांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ते महिलांना अपवित्र मानतात..