शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारी देशांना चिंता : हिरली क्लिंटन

अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे की, चीनमचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे चीन शेजारील राष्ट्रांच्या भूप्रदेशामध्ये घुसरखोरी करण्याच्या घटना वाढत आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 28, 2017, 10:42 PM IST
शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारी देशांना चिंता : हिरली क्लिंटन title=

बीजिंग : अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे की, चीनमचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या वाढत्या ताकदीमुळे शेजारील राष्ट्रंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या वाढत्या ताकदीमुळे चीन शेजारील राष्ट्रांच्या भूप्रदेशामध्ये घुसरखोरी करण्याच्या घटना वाढत आहेत.

हिलरींनी केली ट्रम्प यांच्यावरही टीका

अमेरिकेत गेल्याच वर्षी पार पडलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन या प्रमुख उमेदवार होत्या. मात्र, त्यांचे विरोधक डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. चीनमुद्द्बाबत अमेरिकेचे धोरण या विषयावरून क्लिंटन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली.

नोतृत्वाची विश्वासार्हता जबाबदारीने वाढते

दरम्यान, शी जीनपींग हे चीनचे राष्ट्रपती आहेत. पण, सोबतच ते सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (सीपीसी) सर्वेसर्वाही आहेत. गेल्याच महिन्यात सीपीसीचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यात पुढील पाच वर्षांसाठी जिनपींग यांची बहुमताने निवड करण्यात आली. चीनी वृत्तपत्र 'कायजिंग'च्या एका कार्यक्रमात बोलताना हिलरी क्लिंटन म्हणाल्या, नेतृत्वाची विश्वासार्हता ही जबाबदारीच्या भूमिकेतून दृढ होत असते. ती केवळ सैन्याच्या तयारीने होत नाही. तशीच ती शेजाऱ्यांच्या प्रदेशात घुसखोरी करूनही होत नसते, अशा शब्दांत हिलरी क्लिंटन यांनी जीनपींग यांच्यावर हल्ला चढवला.

हिलरींनी दिली अनेकांना प्रेरणा

हॉंगकॉंग स्थित 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने मंगळवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शेकडो चीनी व्यापारी आणि व्यावसायिकांना, उद्योजकांना हिलरी क्लिंटन यांच्या भाषणाने प्रेरित केले.