World's Richest Village: जगातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक व्यक्तीची कमाई ऐकाल तर चक्रावून जाल

1961 साली वसवलेल्या गावाची सुरुवातीची स्थिती खूपच वेगळी होती. आता जगातील श्रीमंत गाव म्हणून हुआजी गाव ओळखलं जातं. 

Updated: Jun 4, 2022, 12:59 PM IST
World's Richest Village: जगातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक व्यक्तीची कमाई ऐकाल तर चक्रावून जाल title=

मुंबई: जगातील श्रीमंत व्यक्तींबाबत तुम्ही ऐकलं असेलच. या यादीत इलॉन मस्क यांच्यासह भारतातील मुकेश अंबानी आणि गौतम अदाणी यांच्या समावेश आहे. आता आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत गावाबाबत सांगणार आहोत. या गावातील प्रत्येक व्यक्तीची कमाई पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. जगातील श्रीमंत गावातील प्रत्येक व्यक्ती लखपती आहे. हुआझी नावाचं श्रीमंत गाव चीनमधील जियांगयिन शहराजवळ आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीची कमाई ८० लाखांहून अधिक आहे. विशेष म्हणजे या गावातील अधिकतम लोकं शेतीवर अवलंबून आहेत. या गावातील शेतकरी बंगला, लक्झरी गाड्या वापरतात. या गावात मेट्रो सिटीसारख्या सुविधा आहेत.

1961 साली वसवलेल्या गावाची सुरुवातीची स्थिती खूपच वेगळी होती. या गावातील लोकांची परिस्थिती खूपच बिकट होती. त्याचबरोबर शेतीतून हवं तसं उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र इथल्या लोकांनी परिस्थितीपुढे हतबल न होता प्रयत्न सुरु ठेवले. कठोर परिश्रमानंतर गावातील स्थिती बदलली आणि आता जगातील श्रीमंत गाव म्हणून हुआजी गाव ओळखलं जातं. 

गावाचे अध्यक्ष वू रेनवाओ यांनी आपल्या गावाची स्थिती बदलण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांनी आखलेल्या योजनांमुळे गावाची भरभराट झाली. या गावातील शेतकरी गटाने शेती करु लागले. सामूहिक शेतीमुळे या गावाचं भविष्य बदललं आणि उत्पन्नात वाढ होऊ लागली.