मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट

Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 24, 2024, 11:32 AM IST
मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट title=
woman went on a girls trip then realise she is unhappy with husband

Trending News In Marathi: पती-पत्नी यांच्यात अनेक कारणांवरुन वाद होत असतात. कधी कधी याच वादातून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. संसार सुरळीत चालवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न गरजेचे असतात. कोणा एकाकडून नात्यात विश्वासघात झाला तर नात्यात दरी निर्माण होऊ शकते. अलीकडेच महिलेने तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे. त्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. लिव्हरपूल येथील ही घटना आहे. 

रोजची कामे यातून थोडा ब्रेक घेण्यासाठी महिला मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली. स्टेफनी हॅनसन असं या महिलेचे नाव आहे. ट्रिपला गेलेल्या या महिलेच्या डोक्यात अचानक तिच्या लग्नाचे विचार आले आणि सगळंच बदललं. मे 2022मध्ये केफालोनिया ग्रीस येथे ही महिला तिचा 40 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. तिथे स्टेफनीने तिच्या मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय केलं. ट्रिपवर गेलेल्या स्टेफनीला तिच्या रोजच्या तणावपूर्ण आयुष्यातून थोडा ब्रेक मिळाला. 

ट्रिपवर मैत्रिणींसोबत असताना स्टेफनीला लक्षात आले की तिला आता तिच्या पतीसोबत राहण्याची इच्छा नाहीये. तिच्या आयुष्यात ती किती दुखी आहे याचा अंदाज तिला आला. त्यामुळं जेव्हा ती ट्रिपवरुन परत घरी गेली तेव्हा पतीशी बोलून हे नाते इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. तिने त्याला घटस्फोट घेण्याचा विचार बोलून दाखवला. 

स्टेफनीला चार मुलं आहेत. ती म्हणते की, जेव्हा ती ट्रिपवर होती तेव्हा तिला मुलांची खूप जास्त आठवण यायची. मात्र तिला पतीची आठवण अजिबात आली नाही. त्याचवेळी तिला लक्षात आले की ती किती दुखी आहे. स्टेफनीने म्हटलं आहे की, ती आता खुश राहण्यासाठी व आयुष्य नव्याने सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ती जेव्हा युकेला परत गेली तेव्हा तिने पतीला सांगितले की तिला घटस्फोट घ्यायचा आहे. 

स्टेफनी म्हणते की, जेव्हा मी घरापासून दूर होते तेव्हा मला मुलांची खूप आठवण यायची. मात्र मला तुझी अजिबात आठवण आली नाही. याचे कारण शोधण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांच्याशी बोलून मला जाणवलं की माझं आता पतीवर प्रेम नाहीये. मी त्या दिवसांत माझ्या मैत्रिणींसोबत खूप चांगला वेळ व्यतित केला आणि मला पुन्हा माझ्या पतीकडे घरी जायचं नव्हतं. मला हॉटेलमध्ये राहिल्यावर लक्षात आले की मी या नात्यात कितीतरी वेळापासून दुखी आहे. 

स्टेफनी पुढे म्हणते की, माझ्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर मी दुसरी गोष्ट केली ती म्हणजे माझं वजन कमी केले. सुट्टीच्या दिवसांतील फोटोमध्ये मला लक्षात आलं की माझं वजन खूप जास्त वाढलं आहे. त्यासाठी मी वर्कआउट करण्यास सुरुवात केले. घरी राहूनच चांगला डाइट प्लान फॉलो केला. सुरुवातीला हे माझ्यासाठी खूप कठिण होते. मात्र मी हे करुन दाखवलं.