Woman stop ventilator : एका 72 वर्षीय महिलेने व्हेंटिलेटरच्या होणाऱ्या आवाजाला वैतागून तो बंद केला. या आरोपा खाली वृद्ध महिलेला अटक करण्यात आली आहे. ICU मध्ये असलेल्या अन्य रुग्णाचा व्हेंटिलेटर बंद केल्याचा महिलेवर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात, पोलिसांनी रुग्णाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर महिलेची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. (Woman stop another Woman ventilator)
फिर्यादी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने दोन वेळा रुग्ण महिलेचा व्हेंटिलेटर बंद केला. व्हेंटिलेटर रुग्णासाठी आवश्यक आहे... असं देखील महिलेला अनेकदा सांगण्यात आलं. पण तरी देखील वृद्ध महिलेने दोन ते तीन वेळा व्हेंटिलेटर बंद केला.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या मंगळवारी मॅनहाइममध्ये ही घटना घडली. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरवर 79 वर्षीय महिलेला ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटर बंद केल्यानंतर 79 वर्षीय महिलेचा जीव देखील गेला असता. पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. पण अद्यापही 79 वर्षीय महिलेची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे.
सध्या या घटनेमुळे फक्त जर्मीनीच (Germany) नाही तर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. आपण कायम आपल्या जवळच्या माणसाची जीव वाचवण्यासाठी (german hospital) प्रयत्न करत असतो. पण असं काही झालं की मोठा धक्का बसतो. आता 79 वर्षीय महिलाची प्रकृती स्थिर असली तरी, काळजी घ्यावी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.