मेट्रो स्टेशनवर तिने वर केला स्कर्ट, कारण...

महिला आणि मुलींच्या स्कर्टकडे नजर रोखून पाहणाऱ्या आणि भलत्यासलत्या कमेंट करणाऱ्या अनेकांना एका मुलीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या मुलीने प्रत्युत्तर दिले खरे. पण, त्यासाठी तिने जो मार्ग निवडला तो अनेकांच्या भूवया उंचावणारा ठरला. तिच्या या कृतीचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 30, 2017, 07:42 PM IST
मेट्रो स्टेशनवर तिने वर केला स्कर्ट, कारण... title=
छायाचित्र सौजन्य - यूट्यूब

नवी दिल्ली : महिला आणि मुलींच्या स्कर्टकडे नजर रोखून पाहणाऱ्या आणि भलत्यासलत्या कमेंट करणाऱ्या अनेकांना एका मुलीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या मुलीने प्रत्युत्तर दिले खरे. पण, त्यासाठी तिने जो मार्ग निवडला तो अनेकांच्या भूवया उंचावणारा ठरला. तिच्या या कृतीचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एना डोवगल्युक नावाची असे या तरूणीचे नाव असून, ती एका मेट्रो स्टेशनवर उभी आहे. तिच्या आजूबाजूने प्रवासी ये जा करताना दिसत आहेत. मात्र, ती बीनधास्तपणे आपला स्कर्ट खाली वर करताना दिसत आहे. ही मुलगी आपण समाजसेविका असल्याचे सांगते.

दरम्यान, तिने हा या विचीत्र प्रकाराचा व्हिडिओ पोस्ट केला असून, त्याखाली 'हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना मुलींच्या स्कर्टखाली वाकून पहायला आवडते. ज्या मुली तुमच्या शिकार ठरतात अशा सर्व मुलींच्या वतीने इकडे पहा आणि आमच्यापासून दूर रहा.' सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.