NASA Moon Mission : मानवाचे चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. अमेरिकेची आंतराळ संस्था NASA चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबवत आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे ध्येय नासाने विश्चित केले आहे. यासाठी आपल्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅन नासाने तयार केला आहे. तर, दुसरीकडे वैज्ञानिकांनी सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते बनवण्यासाठी विशेष संशोधन केले आहे.
चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्यासाठी चंद्रावर रस्त्यांसह लँडिंगपॅड विकसीत करणे गरजेचे आहे. चंद्रावर विविध संशोधन करताना लागणारे साहित्य चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यासाठी कायम स्वरुपी लँडिंगपॅड असले पाहिजेत. तसेच यासाठी रस्त्यांची देखील गरज पडेल. यामुळे चंद्रावर रस्त्यांसह लँडिंगपॅड बनवले जाणार आहेत.
चंद्रावरील माती, धुळीचे कण तसेच दगड यांचा वापर करुन चंद्रावर रस्ते तयार केले जाणार आहेत. चंद्रावर कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. तसेच येथे गुरुत्वाकर्षण देखील अतिश कमी आहे. यामुळे चंद्रावरील माती तसेच धुळीचे कण हवेत तरंगत राहतात. यामुळे चंद्रावर संशोधन करणारे स्पेसक्राफ्ट यामुळे खराब होतात. सूर्याच्या मदतीने चंद्रावर रस्ता तयार करण्याचा जबरदस्त प्लान वैज्ञानिकांनी बनवला आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने, बर्लिनमधील फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल रिसर्च अँड टेस्टिंगचे प्रोफेसर जेन्स गुन्स्टर यांनी चंद्रावर रस्त्यांची निर्मी करणे शक्य असल्याचे म्हंटले आहे.
चंद्रावरील मातीला रेगोलिथ असे म्हणतात. इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन (ISRU) तंत्राच्या मदतीने चंद्रावर रस्ते बांधले जाणार आहेत. जास्त पावर असलेल्या CO2 लेजरच्या ( high-power CO2 laser) मदतीने सूर्यप्रकाशात रेगोलिथ वितवळले जाणार आहेत. यानंतर या रेगोलिथचे त्रिकोणी आकाराचे मजबूत ब्लॉक बनवले जाणार आहेत. यानंतर या ब्लॉकच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर रस्ते तसेच लँडिंगपॅड बनवले जाणार आहेत.
चंंद्रावर तापमान कसे आहे? चंद्राववरीची जमीन नेमकी कशी आहे? येथे घरांची निर्मीती करण्यासाठी काय करता येईल यावर संशोधन सुरु आहे. या संशोधनात संशोधकांना मोठे यश मिळाले आहे. चंद्रावरील धूळ ही मानवाच्या शरीरासाठी अत्यंत धोकायदायक असल्याचे देखील संशोधनात समोर आले आहे. मात्र, यापासून मानवाचा कशा प्रकारे बचाव करता येईल यावर देखील संशोधन सुरु आहे. ज्या प्रमाणे पृथ्वीवर येथील माती तसेच खनिजांचा वापर करुन घरांची निर्मिती केली जाते त्याप्रमाणे चंद्रावर घरांची निर्मीती करताना चंद्राच्या पृष्ठभागावरील माती तसेच खनिजांचा वापर केला जाणार आहे. 3D प्रिंटरच्या मदतीने चंद्रावर घर बांधली जाणार आहेत. चंद्रावरील धूळ, माती तसेच दगड यांचा वापर करुन येथे इमारती बांधण्याची योजना आहे.