वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवरुन भारतात आलेत. 

Updated: Mar 2, 2019, 11:35 AM IST
वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात title=

वाघा बॉर्डर : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग अभिनंदन अटारी-वाघा सीमेवरुन भारतात दाखल झाले आहेत. कागदपत्राच्या प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास ते भारतात दाखल झाले. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशात एकच जल्लोष साजरा करण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या पथकाने अभिनंदन यांचे मायभूमीत स्वागत केले. अभिनंदन यांचे आई-वडीलही यावेळी उपस्थित होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अटारी-वाघा सीमेवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करताच तेथे उपस्थित भारतीयांनी त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.  

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवर पोहोचले आहेत. आता अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देण्यात येत आहेत. अभिनंदन हे पाकिस्तानकडून भारताच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. काही मिनिटात अभिनंदन भारतात दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात

पाकिस्‍तानच्या ताब्‍यात गेल्‍या तीन दिवसांपासून असलेले  अभिनंदन वाघा बॉर्डर ओलांडून अखेर मायदेशात पतरले आहेत. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना वाघा बॉर्डरवरुन थेट जयपूरला आणण्यात आले. तेथून त्यांना दिल्लीला आणले जाणार आहे. दरम्यान,भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला करत बालाकोट येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची एफ १६ विमाने पिटाळून लावली. त्याचवेळी भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले. हे मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी सर्वोपतरी प्रयत्न सुरु केले होते.