Operation Theatre: 'थिएटर' या शब्दाचा अर्थ काय; 'ऑपरेशन थिएटर' नावामध्ये त्याचाच वापर का बरं?

Why is operation theatre called theatre: ऑपरेशन थिएटरला आपण थिएटर का म्हणतो याचा तुम्ही कधी (Name Reason Behind Operation Theatre) विचार केला आहे का? नसेल तर ही बातमी वातून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ऑपरेशन थिएटरच्या नावामागे एक इंटरेस्टिंग (Interesting Fact) गोष्ट आहे. 

Updated: Mar 20, 2023, 11:30 AM IST
Operation Theatre: 'थिएटर' या शब्दाचा अर्थ काय; 'ऑपरेशन थिएटर' नावामध्ये त्याचाच वापर का बरं? title=
Why is operation theatre called theatre to know this interesting fact read the full article

Why is operation theatre called theatre?: तुम्ही कधी ऑपरेशन थिएटरला 'थिएटर' (Operation Theatre) असा शब्द का जोडला आहे याचा कधी विचार केला आहे का? अनेकांना वाटतं की, याचा संबंध थेट नाटक पाहिली जातात त्या थिएटरशी संबंधित आहे. तर हो, तुम्ही काहीसे बरोबर आहात. परंतु त्यामागेही एक रंजक कारण (Interesting Fact of Operation Theatre) आहे. ऑपरेशन थिएटरच्या नावामागे कुठलेही शास्त्रीय कारणं नाहीये तर माणसांच्या सोयीनुसार हे नावं पडले आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्ही कधी केला असाल तर संपुर्णपणे शांतता, मास्क आणि प्लॅटिक ड्रेसमध्ये शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर, नर्स, शस्त्रक्रियेला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, एक मध्यभागी दिवा आणि पेशंट असं चित्र आपण अनेकदा चित्रपट अथवा मालिकांमधून पाहिले असेलच. पण ऑपरेशन थिएटर हेच नावं का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया. (Why is operation theatre called theatre to know this interesting fact read the full article) 

काय आहे यामागील कारणं? (Why We Use Term Operation theatre)

थिएटर हा इंग्रदी शब्द नसून तो ग्रीक भाषेतून आला आहे. याचा अर्थ असा होता की, 'पाहण्याची जागा'. अशी पाहण्याची जागा जिथून अधिक संख्येनं लोकं ही समोर घडणारी प्रक्रिया पुर्णपणे पाहू शकतील. या कारणांमुळे ऑपरेशन थिएटरसुद्धा फिल्म थिएटरप्रमाणे बांधले जायचे. त्यामुळे नव्यानं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Difference Between Operation Theatre and Film Theatre) दुसऱ्या बाजूनं शस्त्रक्रियेची संपुर्ण प्रक्रिया पाहायला मिळायची. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना संपुर्ण शस्त्रक्रिया कशी होते या प्रत्यक्ष पाहता येयाचे. यांना थिएटरमध्ये जशी बसायला सीट असते तशीच सीटही होती. विद्यार्थ्यांसोबत येथे नर्सही हजेरी लावायच्या. पुर्वी म्हणजे 20 व्या शतकामध्ये हा शब्द जास्त प्रचलित होऊ लागला आणि तेव्हापासून ऑपरेशन थिएटर हा शब्द रूढ झाला. 

असं आहे रंजक कारणं... (The Interesting Fact Behind Operation theatre Name)

आपल्याला माहितीच आहे की, सिनेमाहॉल्स, नाटकाचा रंगमंच आणि नाचण्याचे दालन याला आपण थिएटर असा शब्द देतो. आपल्याला एकाच ठिकाणी बसून विशिष्ट गोष्ट अधिकवेळ अनेक लोकांसमवेत पाहायला मिळते. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी अनेक लोकांना एखादी गोष्ट पाहायला मिळणं या प्रक्रियेला थिएटर असं बोलीभाषेत शब्द निर्माण झाला आहे. त्यामुळे फिल्म, नाटक, नृत्य अथवा गाणं ऐकण्यासाठी अन् पाहण्यासाठी आपण ज्या ठिकाणी जातो त्याला आपण थिएटर असं म्हणतो. त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे ऑपरेशन होतं त्या जागेलाही थिएटर असे संबोधले गेले. 

ऑपरेशन थिएटर हा शब्द आता इतका प्रचलित झाला आहे की आपल्या तोंडात तो फीट बसला आहे.