अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : कोरोनाचा (Corona Virus) कहर पूर्ण संपलाय, जग कोरोनातून सावरलंय. पण त्यात आता नव्या X व्हायरसची भिती संशोधकांनी वर्तवलीय. कोरोनापेक्षा भयंकर हा X व्हायरस असल्याचं शास्त्रज्ञांना वाटतंय. नेमका हा व्हायरस X आहे तरी कसा? पाहुयात एक रिपोर्ट. (who world health orgnistaion priority pathogens disease x corona)
कोरोनातून जग सावरलंय, कोरोना जगातून हद्दपार करण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न होतायत. पण याचदरम्यान एका नव्या व्हायरसची भिती शास्त्रज्ञांनी वर्तवलीय. सध्या या व्हायरसला X असं नाव देण्यात आलंय. हा व्हायरसच भविष्यातील एखाद्या महामारीचं कारण ठरु शकतो असा दावा WHOच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलाय. या व्हायरसविषयी आतापर्यंत जी माहिती समोर आलीय.
लक्षणं अज्ञात असल्यामुळे ओळखणं अवघड आहे. एखाद्या छोट्या इन्फेक्शनमधून पसरू शकतो. एकदा पसरला तर रोखण्याचं अवघड आव्हान आहे. कोरोनापेक्षा अधिक वेगानं पसरतो. कोरोनापेक्षा जास्त वेगानं रूप बदलतो.
भविष्यात कोरोनासारखी कोणतीच महामारी पसरु नये यासाठी WHO कडून अनेक बॅक्टेरिया, व्हायरसवर संशोधन सुरु आहे. त्याचदरम्यान WHOला X व्हायरसबद्दल माहिती मिळालीय. कोरोनापेक्षा अधिक भयंकर हा व्हायरस असल्याचं WHOचं म्हणणं आहे, त्यामुळेच या व्हायरसवर संशोधन सुरु आहे.