लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (RUSHI SUNAK) ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर जगभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे जगातील आणखी एका देशावर मुळचे भारतीय असलेल्या व्यक्तीची सत्ता पाहायला मिळते आहे. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी आणखी एका भारतीयाचा त्यांच्या कोअर कमेटीमध्ये समावेश केला आहे. प्रज्ज्वल पांडे असं त्यांचं नाव आहे. (Indian Boy In sunak core committee)
प्रज्ज्वल पांडे (Prajwal Pande) फक्त 16 व्या वर्षी ब्रिटनच्या कंजर्वेटिव पक्षाचे सदस्य बनले होते. याआधी ते 2019 मध्ये UK यूथ पार्लियामेंटमध्ये सदस्य होते. युवा खासदार म्हणून ब्रिटेनच्या संसदेत त्यांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा तेथील लोकं देखील त्यांचे फॅन झाले होते. त्यांची बहिण प्रांजल पांडे केम्ब्रिज यूनिवर्सिटीमध्ये MBBSचे शिक्षण घेत आहे.
बिहारच्या सीवानमध्ये जन्मलेल्या प्रज्ज्वल पांडेय यांचा आणि जमापूर गावच्या राहणाऱ्या प्रज्जवलने राज्याचं नाव रोशन केल्याचं त्यांच्या गावच्या लोकांचं म्हणणं आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद देखील याच गावचे होते.
प्रज्ज्वल पांडे हे ऋषी सुनक पंतप्रधान होण्याआधी त्यांच्या पक्षाच्या मुख्य अभियान टीममध्ये सहभागी होता. आता ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याने कोअर कमेटीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.