मुलींना Impress करायचंय? मग 'या' सवयी लावा

तुम्हालाही एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

Updated: Jul 19, 2022, 11:13 PM IST
मुलींना Impress करायचंय? मग 'या' सवयी लावा title=

Which type of boys are liked by a girl :​ आजच्या काळात मुला-मुलींची मैत्री खूप सामान्य आहे. असं असलं तरी बहुतेक मुलांना हे माहित नसतं की मुली त्यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात घेतात. कधी मुलींना मुलांच्या काही सवयी आवडतात तर कधी काही सवयी अजिबात आवडत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांना हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते की, मुलींना कोणत्या सवयी आवडतात? तुम्हालाही एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर या काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.

1. आत्मविश्वास
आत्मविश्वास ही बहुधा पहिली गोष्ट आहे जी मुली मुलांमध्ये शोधतात. जर एखादा मुलगा खूप आत्मविश्वासी असेल आणि त्याचा स्वतःवर विश्वास असेल तर ते मुलं मुलींना खूप आवडतात. ही गुणवत्ता मुलींला अधिक आकर्षक बनवते. आत्मविश्वास असलेल्या मुलाच्या आसपास राहिल्याने मुलींना असं वाटतं की त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो.

2. चांगले कपडे घातलेली मुले
कोणत्याही मुलीला प्रत्येक वेळी कोणाचा तरी ड्रेसिंग सेन्स लक्षात येत नसला तरी अनेकदा असं दिसून आलं आहे की, मुलीही मुलांच्या ड्रेसिंग सेन्सवरून अंदाज लावतात की समोरची व्यक्ती स्वतःकडे किती लक्ष देते.

3. ऐकणारी मुले
मुली स्वभावाने अतिशय संवेदनशील आणि भावनिक असतात. मुलींना नेहमी मुलाने त्यांचं ऐकावं असं वाटतं. तुम्हाला मुलीचं ऐकायला आवडो किंवा नाही, पण तरीही तुम्ही तिचं ऐकावे अशी मुलीची इच्छा असेल. असं केल्यास तुम्ही त्यांची आवडती व्यक्ती बनू शकता.

4. हसणं देखील आवडतं
कंटाळवाणा जोडीदार कोणालाही आवडत नाही. हशाशिवाय कोणीही कंटाळवाणा दिसू शकतो. जर असा एखादा मुलगा असेल जो नेहमी हसत असेल आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना हसवत असेल तर तो मुलींना खूप आकर्षित करतो.

5. चांगलं करिअर असलेला मुलगा
करिअरमध्ये यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मुलाकडे मुली जास्त आकर्षित होतात. मुलीला तुमचा पगार आणि दर्जा याची अजिबात काळजी नसली तरी तुमच्या करिअरवरून फक्त तुमची गंभीरता आणि परिपक्वता कळते. अशी नाती जी करिअरमध्ये यशस्वी होतात, ती जास्त काळ टिकतात.

6. जो आदर करतो
मुले मुलीला तेव्हाच प्रभावित करू शकतात जेव्हा ते समोरच्या व्यक्तीचा आदर करतात. त्याने मुलींसाठी काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडा, जेव्हा मुलीला थंडी जाणवते तेव्हा तिला तुमचे जाकीट द्या. थोडं फिल्मी नक्कीच आहे पण मुलींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात.