बेडरुममधील खाजगी क्षण जेव्हा शेजाऱ्यांसाठी समस्या बनतात, न्यायालयात पोहोचलं प्रकरण

लव्ह मेकिंग दरम्यान मोठ्या आवाजामुळे शेजारी जेव्हा नाराज होतात. प्रकरण नंतर जेव्हा थेट न्यायलयात पोहोचतं.

Updated: Sep 24, 2022, 11:50 PM IST
बेडरुममधील खाजगी क्षण जेव्हा शेजाऱ्यांसाठी समस्या बनतात, न्यायालयात पोहोचलं प्रकरण title=

मुंबई : बेडरूमचे क्षण अगदी खाजगी असतात. पण जेव्हा ते दुसऱ्यासाठी समस्या बनतात. तेव्हा काय होते. वेल्समध्ये राहणाऱ्या एका महिलेला दंड ठोठावण्यात आला कारण तिच्या घरातून असे काही आवाज येत होते ज्यामुळे लोकांना त्रास होत होता. ते आवाज लव्ह मेकिंग दरम्यानचे होते. महिलेकडून सुमारे 91 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

रेक्सहॅम, वेल्स येथील रहिवासी असलेल्या 41 वर्षीय क्रिस्टीन मॉर्गनविरुद्ध तिच्या शेजाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितले की, प्रेमाच्या वेळी क्रिस्टीन मॉर्गनच्या घरातून खूप मोठा आवाज येतो. जे मानसिक त्रासदायक आहे. झोप पण उडते. अनेकदा ताकीद देऊनही जेव्हा आवाज येणे थांबले नाही तेव्हा क्रिस्टीनाला स्थानिक प्रशासनाने बोलावून घेतले.

खरं तर, क्रिस्टीन सिंगल मदर आहे. हे आवाज आपल्या घरातून येतात, मात्र ते आपले नाहीत, असे त्यांनी प्रशासनाला सांगितले. खरं तर, जेव्हा ती नाईट शिफ्ट करते तेव्हा तिचा 23 वर्षांचा मुलगा आणि त्याची मैत्रीण घरीच असतात. त्यानंतर प्रशासनाने त्यांना £1,000 (91 हजार) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

क्रिस्टीनच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, कुटुंबाला अनेक वेळा इशारा देण्यात आला होता. पण त्याच्या लक्षात आले नाही. 26 डिसेंबर 2021 ते 4 एप्रिल दरम्यान, त्यांनी मोठ्या आवाजात सेक्स करणे सुरूच ठेवले. लॉकडाऊन दरम्यान आवाज होत असल्याने आणि तो 'काही लोकांना खूप त्रासदायक' होता म्हणून त्यांनी तक्रार केली होती. या घरात क्रिस्टीन तिचे वृद्ध वडील, मुलगा आणि किशोरवयीन मुलीसोबत राहते.

आईला न्यायालयाने फटकारले
जेव्हा ही तक्रार अधिकाऱ्याकडे आली तेव्हा त्यांनी क्रिस्टीनला त्याचा मुलगा आणि त्याच्या मैत्रिणीसोबत रूम बदलण्याची सूचना केली. मात्र त्यानंतरही गोंगाट सुरूच होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी नॉईज मॉनिटर्स लावले. रात्री उशिरा किंवा पहाटे आवाज यायचा. न्यायालयाने महिलेला दंड ठोठावला आणि तिला घराचे इन्सुलेशन करण्यास सांगितले. न्यायालयाने महिलेला फटकारले आणि म्हटले की, जरी ती स्वत: याला वैयक्तिकरित्या जबाबदार नाही. पण आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यामुळे शेजाऱ्याला त्रास होऊ नये हे तिने पाहिले पाहिजे. यासोबतच त्यांच्या मुलावर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 4 गुन्हेही दाखल आहेत. त्याच वेळी, मुलाने सांगितले की कोणालाही नाराज करण्याचा त्याचा हेतू नव्हता.