Viral Video: अजगराने त्याला घट्ट मिठीत पकडलं होतं, हरिणाचा जीव जाणार तोच तिथे आला देवदूत आणि...

हरणाला अजगर गिळणारंच होता, हे पाहून एक व्यक्ती पुढे आला आणि... 

Updated: Sep 24, 2022, 10:29 PM IST
Viral Video: अजगराने त्याला घट्ट मिठीत पकडलं होतं, हरिणाचा जीव जाणार तोच तिथे आला देवदूत आणि... title=

Python Attacked Deer: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल याला कोणतं कारण लागत नाही (Social media viral video). मात्र तुम्ही कायम असे व्हिडीओ पाहत असाल तर तुम्हाला मुख्यत्त्वे लहान मुलांचे व्हिडीओ ( Kids Video) किंवा काही प्रॅन्कचे व्हिडीओ ( Prank Video) वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताना पाहायला मिळतील. सोबतच प्राण्यांचे व्हिडीओ देखील अनेकांना पाहायला आवडतात. प्राण्यांच्या व्हिडिओमध्ये जंगल फाईट्स( Jungle Fights) , किंवा साप आणि मुंगूस यांची टक्कर ( snake and mongoose fight), असे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. आज या बातमीत जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात तो व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. 

या व्हिडिओत एक भला मोठा अजगर (Huge python) पाहायला मिळतोय. या अजगराच्या घट्ट मिठीत एक मोठा प्राणीही पाहायला मिळतोय. हा प्राणी दुसरा तिसरा कुणीही नाही तर एक मोठं हरीण आहे. जसजसा हा व्हिडीओ आपण पाहतो तसा हा अजगर तसाच या हरणाला गिळंकृत करणार असं वाटतं. मात्र ते म्हणतात ना काळ आलेला पण वेळ आली नव्हती. असंच काहीसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि अधोरेखित देखील होतं. समाजमाध्यमांवर व्हायरल होणार हा व्हिडीओ खूपच भयानक आहे. 

'तो' देवासारखा धावून आला 

एकीकडे या अजगराने हरणाला घट्ट मिठी मारली आहे, मागे एक गाडीही उभी असल्याचं पाहायला मिळतं. या गाडीतल्या माणसाला कदाचित पुढे जावं का जाऊ नये हा प्रश्न पडलाय. मात्र या व्हिडिओत अचानक एंट्री होते एका व्यक्तीची. ही व्यक्ती हातात झाडाची फांदी घेऊन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं..

मग पुढे काय होतं? आधी व्हिडीओ पाहा... 

खरंतर हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकेल. पण एका माणसाने मोठ्या हिमतीने या अजगरावर झाडाच्या फांद्या मारून या हरिणाला जीवदान दिलं. हा अजगर या माणसावर देखील धावून गेला. पण हा अजगर या माणसाचं काहीही वाकडं करू शकला नाही. शेवटी त्याला जंगलात पळून जावं लागलं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळतेय. 

video of python gulping deer but brave man saved deer video goes viral