कितीही धमक्या दिल्या तरी चीन तैवानवर हल्ला करू शकत नाही... जाणून घ्या यामागील सत्य

प्रश्न असा उपस्थीत राहातो की, हे 'सिलिकॉन शिल्ड' आहे तरी काय? ज्यामुळे हे दोन्ही महाशक्ती असलेले देश तैवानला काहीच करु शकत नाही. चला जाणून घेऊ.

Updated: Aug 4, 2022, 05:07 PM IST
कितीही धमक्या दिल्या तरी चीन तैवानवर हल्ला करू शकत नाही... जाणून घ्या यामागील सत्य title=

मुंबई : जगभरात सर्वाधिक चर्चा चीन आणि तैवान यांच्यात चाललेल्या वादावर होत आहे. सर्वच लोकांचं लक्ष याकडे वळलं आहे. कारण जगात कुठेही वाद किंवा युद्ध सुरु झालं की, त्याचा परीणाम जगाला भोगावा लागतो. यामुळेत फक्त देशातच नाही तर जगात शांती टिकवणे गरजेचं आहे. परंतु चीन आणि तैवानचे संबंध दीर्घकाळापासून ताणले गेले आहेत. ज्यामुळे त्याचं रुपांतर आता मोठ्या वादात झालं आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे चीन चांगलाच नाराज झालेला दिसत आहे.

नॅन्सी पेलोसी जेव्हा तैवान सोडतील तेव्हा चीन त्यावर लष्करी कारवाई करू शकतो, असं देखील बोललं जात होतं. एवढेच नाही तर चीन आपली क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणाही तेथे पाठवत आहे. असं बोललं जात आहे.

या सोबतच तुम्ही अनेक वेळा एकलं असेल की, चीन तैवानवर हल्ला करत आहे. परंतु असं काहीही घडत नाही. चीनसमोर तैवान हा एक अतिशय छोटा देश आहे. त्यामुळे याला संपवणं चीनसारख्या बलाढ्य सैन्याला सहज शक्य आहे. परंतु तो तसं करत नाही. पण असं का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

तर याचं उत्तर आहे 'सिलिकॉन शिल्ड', यामुळेच चीनच काय तर अमेरीका देखील तैवानचं काहीही करु शकत नाही.

आता पुन्हा हा प्रश्न उपस्थीत राहातो की, हे 'सिलिकॉन शिल्ड' आहे तरी काय? ज्यामुळे हे दोन्ही महाशक्ती असलेले देश तैवानला काहीच करु शकत नाही. चला जाणून घेऊ.

हे सिलिकॉन शील्ड काय आहे?

तैवान उत्पादनाच्या बाबतीत खूप पुढे आहे. लढाऊ विमानापासून ते सोलर पॅनेल, चिप्स इत्यादीपर्यंत भरपूर उत्पादन येथे होते. संपूर्ण जगात सेमीकंडक्टर चिप्स बनवणारा तैवान हा एकमेव देश आहे. आता ही निर्मितीच त्याच्यासाठी ढाल म्हणून काम करत आहे. मोठ्या देशांच्या हल्ल्यापासून तैवानचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही शस्त्र नाही, तर चिप उत्पादन आहे.

अमेरिकेसारखा देश या उद्योगावर परिणाम करू इच्छित नाही, अन्यथा अनेक देशांवर परिणाम होईल, असे मानले जाते. आता हे उत्पादन एक ढाल बनून तैवानला हल्ल्यापासून वाचवत आहे.

याचा किती परिणाम होईल?

रिपोर्ट्सनुसार, जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याचे आर्थिक नुकसान होईल आणि तैवानच्या टेक पॉवरचा चीनवर खूप परिणाम होऊ शकतो. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. जर तैवानवर हल्ला झाला तर हायटेक चिप्स/सेमीकंडक्टरच्या कमतरतेचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागेल.

याचा फटका प्रत्येक देशाला बसणार आहे. यूएस-आधारित सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशनच्या 2021 च्या अहवालानुसार, युद्धामुळे तैवानमधील चिप उत्पादनावर परिणाम झाल्यास इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मात्यांना $490 अब्ज डॉलरचे नुकसान होऊ शकते. अनेक मोठ्या कंपन्याही येथून चिप्स घेतात.

तसेच, जगातील फक्त काही देश तैवानला वेगळा देश मानतात. तर अनेक देश चीनच्या दबावामुळे त्याला वेगळा देश मानत नाहीत. तैवानला मान्यता मिळेल असे काही इतर देश करू नयेत, असाही चीनचा प्रयत्न आहे. त्याचवेळी अमेरिका तैवानलाही पाठिंबा देते, कारण तैवानवर चीनचा ताबा असेल तर हा व्यवसाय चीनसोबत येईल, ज्याचा परिणाम अमेरिकेवर होऊ शकतो.