वुहानमध्ये पुन्हा सुरु झाला जनावरांचा बाजार; कुत्रा, मांजर, वटवाघुळाचं मांस विक्रीला

चीन अजूनही यातून धडा घेताना दिसत नाही.

Updated: Mar 30, 2020, 08:14 PM IST
वुहानमध्ये पुन्हा सुरु झाला जनावरांचा बाजार; कुत्रा, मांजर, वटवाघुळाचं मांस विक्रीला title=

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. चीनच्या वुहान प्रांतातून उद्भवलेल्या या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. चीनने या विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. चीनच्या वुहान प्रांतात पुन्हा एकदा प्राण्यांच्या बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. या बाजारपेठांमध्ये कुत्रा, मांजर आणि वटवाघुळाचे मांस विकले जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी वुहानमधील अशाच मांस बाजारातून मनुष्यामध्ये कोरोना विषाणू पसरला होता. कोरोना विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केला. या विषाणूमुळे भयानक विनाश होतो आहे. व्हायरसमुळे आतापर्यंत 33 हजार लोकांचा बळी गेला आहे. जागतिक अर्थव्यवस्था आयसीयूपर्यंत पोहोचली आहे.

चीनच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा वटवाघुळाचे मांस विकले जात आहे. व्यतिरिक्त कुत्री, मांजरी, विंचू आणि इतर प्राण्यांचे मांस विक्रीस ठेवण्यात आले आहे. चीनने देशभरातील लॉकडाऊन मागे घेतला आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी चीन सरकार लोकांना बाजारात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून बाजारपेठ बंद होती

वुहानमधील जनावरांची बाजारपेठ गेल्या तीन महिन्यांपासून बंद होती. जानेवारीत ती बंद करण्यात आली होती. चीनच्या हुबेई प्रांताचे वुहान शहर 23 जानेवारीला बंद करण्यात आले. सर्व उड्डाणे, गाड्या, बस सेवा बंद करण्यात आल्या. महामार्गाकडे जाणारा रस्ताही बंद होता. सर्व शाळा, विद्यापीठे, व्यवसाय संस्था बंद होती. एका व्यक्तीला दर तीन दिवसांनी रेशनसाठी बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. वयोवृद्ध आणि आजारी लोकांना त्यांच्या घरीच राहण्याची सूचना देण्यात आली. वुहानमध्ये पुन्हा जनजीवन रुळावर येत आहे. वुहान आणि हुबेई येथील लोकांना गेल्या तीन महिन्यांपासून घरात डांबले गेले. आता तेथील बाजारपेठेत हालचाली सुरू झाल्या आहेत.