मॉस्को : महासत्ता अमेरिकेला टक्कर देणाऱ्या आणि जगातील दुसरी महासत्ता असे बिरूद एकेकाळी मिळवणाऱ्या रशियाच्या राजकारणात लवकरच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सक्रिय राजकारणातून लवकरच सन्यास घेण्याची शक्यता आहे. पुतीन यांनी रशियाच्या राजकारणावर अल्पावधीतच मजबूत पकड निर्माण केली. तसेच, अध्यक्षपदावर आल्यापासून ते प्रदीर्घ काळ सत्तेत सत्तेत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातही पुतीने हे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यामुळे पुतीन यांच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या नाहीत तरच नवल. अर्थात, पुतीन यांच्या गोटातून मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया आली नाही. पण, त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेची दखल मात्र, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.
'द इंडिपेंडंट'ने दिलेल्या वृत्तानुसार पुतीन हे प्रचंड थकले आहेत. त्यामुळे ते येणारी निवडणूक लडणार नाहीत. तसेच, प्रचारासारख्या कंटाळवाण्या प्रक्रियेपासूनही दूर राहतील. येत्या मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकीपासूनच ते निवृत्तीची प्रक्रिया घेऊ शकतात अशीही शक्यता आहे.
व्लादिमीर पुतीन यांनी 2000मध्ये सत्ताग्रहण केली. 2000 ते आजपर्यंत (2017) सत्तेत कायम आहेत. त्यांनी या काळात 3 निवडणूका सलग जिंकल्या आहेत. दरम्यान, असेही वृत्त आहे की, व्लादिमीर पुतीन यांची एकूण 160 अरब पाऊंड म्हणजेच 13 हजार 731 अरब रूपयांची संपत्ती खर्च करू इच्छितात. त्यामुळे ही संपत्ती खर्च करण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. म्हणून त्यांना निवृत्ती हवी आहे. तर, अशीही बातमी परसरली आहे की, व्लादिमीर पुतीन यांनी गुपचूपपणे बरीच माया जमवली आहे. आणि आता ते जगभरातील श्रीमंत मंडळींपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
प्राप्त माहितीनुसार पुतीन यांच्याकडे सुमारे अडीच अरब रूपयांची एक नाव आहे. जी त्यांना भेट म्हणून मिळाली होती. सोबतच एक राजवाडाही पुतीन यांच्या मालकीचा आहे. या राजवाड्याची किंमत तब्बल 69 अरब रूपये इतकी असल्याचे सांगितले जाते. पुतीन यांचे राजकीय विरोधक नेमस्तोवने एका डॉजियरमध्ये दावा केला होता की, पुतीन यांच्याजवळ 58 विमाने आणि हेलिकॉप्टर्स आहेत. तसेच, त्यांच्याकडे जगभरातील घड्याळांचे असे कलेक्शन आहे की, ज्यांची किंमत तब्बल 32 कोटी रूपयांहून अधिक आहे. पुतीन हे 20 राजवाडे आणि हॉलेटलचे मालक आहेत, असाही दावा या डॉजियरमध्ये करण्यात आला होता. काही कागदपत्रांच्या हवाल्याने 'टेलिग्राफ'ने दिलेल्या वृत्ता पुतीन यांच्या प्रायव्हेट विमानात तब्बल 35 लाख रूपयांचे टॉयलेट असल्याचा दावा करण्यात आला होता.