Viral Video: स्वत:च्याच घरात चोरासारखी घुसली महिला अन् झालं भलतंच... तुम्हीही खदाखदा हसाल!

Viral video woman climbing window video :  दोन बहिणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये स्वत:च्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणींनी का केला? 

सौरभ तळेकर | Updated: Feb 4, 2024, 05:24 PM IST
Viral Video: स्वत:च्याच घरात चोरासारखी घुसली महिला अन् झालं भलतंच... तुम्हीही खदाखदा हसाल! title=
Viral video woman climbing window

Woman Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Trending Video) होत असतात. काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू देखील आवरणार नाही. सोशल मीडियावर तुम्ही अनेक रिल्स किंवा पोस्ट पाहिल्या असतील. अशातच दोन बहिणींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. यामध्ये स्वत:च्याच घरात चोरासारखं घुसण्याचा प्रयत्न या बहिणींनी (Woman climbing window) का केला? आणि नंतर काय काय घडलं? हे पाहून तुम्हीही खदाखदा हसाल.

सोशल मीडियावर काही व्हिडीओ चर्चेत असतात. अशातच आता इन्टाग्रामवर एक व्हिडीओ तुफान ट्रेंडमध्ये आहे. दोन महिलांच्या व्हिडीओमध्ये दोघी एका खिडकीजवळ उभ्या असतात. त्यांची काहीतरी कुडबूज सुरू असते. महिला काहीतरी खुसपूस करत असल्याचं समजताच शेजारी काय झालं पाहण्यासाठी जातात. त्यावेळी एकाने या महिलांचा व्हिडीओ काढला. प्रकरण असं होतं की, या दोन्ही बहिणी आपल्या घराची चावी घरातच विसरल्या होत्या. जेव्हा या बहिणी बाजारातून परतल्यावर घरी पोहोचतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की घराच्या चाव्या राहिल्या आहेत.   

चावी मिळवण्यासाठी बहिणींनी खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करतात. एका बहिणीने धाडस केलं अन् आत उडी मारण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एका बहिणीने तिला साथ दिली अन् खिडकीतून तिला आत ढकललं. मात्र, त्यावेळी दुसऱ्या मैत्रिणीला हसू आवरलं नाही. त्यावेळी ती पोटधरून हसली. मात्र, दुसरी मैत्रिण यावेळी खिडकीत अडकल्याचं दिसतंय. हा किस्सा दोन्ही महिला एका कार्यक्रमात मांडताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by This Morning (@thismorning)

दरम्यान, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @thismorning नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत जवळपास 60 हजार लोकांनी लाईक केले आहे. दिस मॉर्निंग नावाच्या शोवर हा महिलांनी हजेरी लावली होती. त्यांनी यांनी किस्सा सांगितला होता.