Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो...

Viral Video : सर्कसमधून एक सिंह निसटला, तो रस्त्यावर आल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. सिंहाच्या दहशतीमुळे लोक घरात लपून बसले...

नेहा चौधरी | Updated: Nov 13, 2023, 01:15 PM IST
 Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो... title=
viral video When a lion escaped from the circus comes to the street italian Town video Trending news

Trending Video : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. प्राणीसंग्रहात जंगलातील खतरनाक आणि धोकादायक प्राणी पाहिला मिळतात. सिंहाची डळकाळी ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राण्या पाहिला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का जर सर्कसमधील सिंह जेव्हा शहरातील रस्त्यावर मोकाट सुटतो तेव्हा काय होईल. अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात दहशत पसरली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. (viral video When a lion escaped from the circus comes to the street italian Town video Trending news)

शहरात एकच दहशत!

हा धक्कादायक व्हिडीओ इटली शहरातील असून सर्कसमधून सिंह रस्त्यावर आल्यामुळे एकच घबराट पसरली. लाडिस्पोली शहरातील लोक सिंहामुळे घरात लपून राहावं लागलं. द सनच्या वृत्तानुसार, सिंहाची दहशत पाहता लाडिस्पोलीचे महापौर अॅलेसॅंड्रो ग्रँडो आणि स्थानिक प्रशासनानेही लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. पोलीस आणि सर्कस कामगारांनी सिंहाला पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. 

किंबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिंहाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज तो सर्कस आणि सोशल मीडियावरील प्रसिद्ध किंबा रस्त्यावर आल्यानंतर मात्र शहरात दहशत पसरली. 

अखरे सिंहाला पकडण्यात यश 

पोलीस, सर्कसचं कर्मचारी आणि पशुवैद्यकांना मोठ्या प्रयत्नानंतर सिंह पकडण्यात यश आलं. सिंहाला पकडणे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं, कारण रायफलसह सज्ज असलेल्या तीन पशुवैद्यांनी सिंहाला शोधून त्याला ट्रँक्विलायझर्सने शूट केलं, मात्र त्याला बेशुद्ध करण्यात ते अपयशी ठरले होते. किंबाला गजाआड करण्यासाठी पोलीस आणि सर्कसच्या कर्मचाऱ्यांना अनेक तास घाम गाळावं लागलं. अखेर रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास दुसऱ्यांदा बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. पण सिंहावर औषधाचा काहीही परिणाम झाला नाही आणि तो पुन्हा पळून जाण्यात यशस्वी झाला. 

शेवटी शहरातील सांगुइनारा ओढ्याच्या काठावर दलदलीत किंबा सिंह अडकला आणि शेवटी रात्री 10 वाजता किंबाला पकडण्यात यश आलं. दरम्यान रॉनी रोलर सर्कस सिंह पिंजऱ्यातून कसा सुटला याचा तपास सुरु आहे.