मुंबई : आपल्या प्रत्येकाला वाटतं ही विज्ञान ही फक्त एक कल्पना आहे. आपण सगळ्यांनी फक्त Mr. India चित्रपटात अभिनेता अनिल कपूर यांना गायब होताना पाहिलं आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात तुम्ही कोणाला गायब झालेलं पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक मुलगी सगळ्यांसमोर गायब होताना दिसते. (Viral Video)
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जपानी मुलगी मिस्टर इंडिया चित्रपटाप्रमाणेच एक मुलगी कॅमेऱ्यासमोरून गायब होते. व्हायरल क्लिप पाहून काही नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ट्विटरवर @Enezator हँडलसह हा व्हिडिओ शेअर करताना नेटकऱ्यानं लिहिले. (Trending Video)
Japanese scientists discovered invisibility pic.twitter.com/OTXc4kN22D
— Great Videos (@Enezator) November 16, 2022
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अवघ्या 14 सेकंदांचा आहे, इंटरनेटवर या व्हिडिओनं खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ एका ऑफिसमध्ये शूट केल्याचे दिसत आहे, जिथे लोक आपली कामं करत आहेत. दरम्यान, लाल टॉप आणि निळ्या जीन्समध्ये एक मुलगी उभी आहे. तिच्या हातात एक चमकदार चादर दिसत आहे. ती साडीप्रमाणे कमरेभोवती गुंडाळते, त्यानंतर मुलीचे अर्धे शरीर गायब होते. हळूहळू त्या मुलीचे संपूर्ण शरीर झाकले जाते आणि काही वेळात ती कॅमेऱ्यासमोर अदृश्य होते.
हेही वाचा : Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड
या व्हिडिओसोबत ट्विटरवर कॅप्शन देण्यात आले आहे. जपानी शास्त्रज्ञांना गायब होण्याचा फॉर्मूला सापडला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी त्याला लाईक केलं आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी याला एडिटींग किंवा क्रोमा असल्याचे म्हटले आहे. (viral video of girl disappeared in front of camera people compared her with mr india movie trending 2022)