क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं; स्टंट करताना त्याचा तोल गेला आणि...

हा व्यक्ती आकाशात चालतेय. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 

Updated: Jul 10, 2022, 01:33 PM IST
क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं; स्टंट करताना त्याचा तोल गेला आणि... title=

viral video - आजकालच्या तरुण पिढीला सोशल मीडियाने भुरळ घातलीये. सोशल मीडियावर लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोकं काहीही करायला तयार असतात. अगदी जीवाचा धोकाही काही वेळा पत्करतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती स्टंट करत असताना त्याचा तोल गेला आणि पुढे जे काही घडलं ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत.

एका क्षणात होतंच नव्हतं झालं

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आकाशात हजारो फूट उंचीवर एका पातळ दोरीवर स्टंट करताना दिसतोय. हे पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. हा व्यक्ती आकाशात एका दोरीवर स्वत:ला बँलेन्स करताना दिसतोय.

हा व्हिडीओ पाहताना असं वाटतं आहे की, हा व्यक्ती आकाशात चालतेय. हे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. खरं तर हा व्यक्ती दोन पॅराशूटच्या दरम्यान बांधलेल्या दोरीवर चालण्याचा प्रयत्न करतोय. पण थांबा...पुढे जे काही होतं ते पाहून तुमचेही डोळे विस्फारतील.  

...आणि जे काही घडलं ते धक्कादायक

हा व्यक्ती स्टंट करत असताना जोरदार वारे व्हायला लागतात. या वाऱ्यामुळे ही नाजूक दोरी हलू लागते. अशात तो व्यक्ती स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या व्यक्तीचा तोल जातो आणि तो खाली पडतो. हा व्हिडीओ सोशल मीडियाचा इंस्टाग्राम या प्लेटफॉर्मवर टाकला आहे.

काय झालं 'त्या' व्यक्तीचं?

हा स्टंट करताना व्यक्तीने सुरक्षितेचे नियम पाळले होते. या स्टंटच्या वेळी व्यक्तीने पॅराशूट घातलं होतं. त्यामुळे जेव्हा तो खाली पडतो. त्याचं पॅराशूट उघडतं आणि तो सुरक्षित जमिनीवर पोहोचतो. मात्र असं जीव घेणे स्टंट करताना शंभर वेळा विचार करा आणि सुरक्षितेचे सगळे नियम पाळा.