Snake Killed Lion: झडप घातली अन् आवळला विळखा... अजगरने केली सिंहाची शिकार; Viral Video ला लाखो व्ह्यूज

Snake Hunt Lion Video: सिंहाने केलेल्या शिकारीचे व्हिडीओ कायमच चर्चेत असतात. मात्र सध्या इंटरनेटवर एका सिंहाच्याच शिकारीचा अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत अशून हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Updated: Jan 18, 2023, 04:07 PM IST
Snake Killed Lion: झडप घातली अन् आवळला विळखा... अजगरने केली सिंहाची शिकार; Viral Video ला लाखो व्ह्यूज title=
viral video huge snake attack mountain lion

Viral Video Snake Attack Lion: सोशल मीडियावर शिकार करणाऱ्या सिंहांचे अनेक व्हिडीओ (Viral Video) तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. मात्र जेव्हा शिकार करण्याचीच शिकार झाली असं सांगितलं तर कोणाच्याही भुवया उंचावतील. मात्र सोशल मीडियावर (Social Media) असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मोठ्या आकाराचा अजगर (huge snake) सिंहाची (mountain lion) शिकार करताना दिसत आहे. आधी हा अजगर या सिंहावर झडप घालतो आणि नंतर या सिंहाच्या संपूर्ण शरीराभोवती आपला फास आवळत शिकार केल्याचं दिसत आहे. काही सेकंदांच्या आत सिंहाने प्राण सोडल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर दिसून येतं. हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला (twitter users in shock) आहे. ही क्लिप पोस्ट करणाऱ्या युझरने हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधी ही घटना घडली याबद्दलची माहिती दिलेली नाही.

या व्हिडीओमध्ये एक डोंगराळ भागांमध्ये आढळणारा सिंह एका खड्ड्याजवळ उभा असल्याचं दिसत आहे. तो या खड्ड्यामध्ये डोकावतो. या खड्ड्यात सिंह काहीतरी शोधायचा प्रयत्न करत अशतो. हा सिंह त्याची मान वर काढतो अन् पुढल्या क्षणाला याच खड्ड्यातून एक अजगर या सिंहावर झडप घेतो. हल्ला केल्यानंतर हा अजगर या सिंहाच्या पूर्ण शरीरावर विळखा मारतो. अजगराची पकड एवढी घट्ट असते की काही सेकंदांमध्ये हा सिंह आपले प्राण सोडतो.

ट्विटर युझर @511turkee नवाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एका लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. 2 मिनिटं 18 सेकंदांचा हा व्हिडीओ एक सीसीटीव्ही फुटेज असल्याचं दिसत आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

Viral Video Snake Mountain Lion Killed Within Seconds

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून धक्का बसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा नेमका सिंह आहे की मांजर याबद्दलची शंका कमेंटमध्ये उपस्थित केली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या खाली व्हिडीओच्या सत्यतेसंदर्भात चर्चा सुरु असल्याचंही दिसत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x