Viral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी

पेरेग्रिन फाल्कन हा पक्षी हा सर्वात वेगवान पक्षी आहे. याचा टॉप स्पीड 390 km प्रति तास आहे.  हा पत्री रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो. 

वनिता कांबळे | Updated: Jan 8, 2024, 05:20 PM IST
Viral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी title=

Rocket Bird : पक्षी हे विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत उडू शकतात. विविध प्रकारचे पक्षी त्यांच्या विशीष्ट वैशिष्ट्यांमुळे ओळखले जातात. मात्र, पेरेग्रिन फाल्कन (Peregrine Falcon) हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे. या पक्षाचा उडण्याचा स्पीड हा  स्पोर्ट्स बाईकच नाही तर स्पोर्ट्स  कारपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हा पक्षी शिकारही तितक्याच सुपरस्पीडने करतो. हा पक्षी रॉकेटच्या स्पीडने आपल्या सावजावर हल्ला करतो. या पक्षाचा शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

स्पीडमुळे या पक्षाच्या वाटेत येणाऱ्या पक्षांची हाड तुटतात

 पेरेग्रीन फाल्कन्स पक्षी हा  पेरेग्रीन बहिरी नावाने देखील ओळखला जातो. हा पक्षी जगातील सर्वांत वेगवान पक्षी मानला जातो. अंटार्टिका वगळता सर्व खंडांमध्ये हा पक्षी आढळतो. कावळ्याच्या आकाराचा हा पक्षाच्या स्पीडसमोर  स्पोर्ट्स बाईकच नाही तर स्पोर्ट्स  कारही फेल ठरतील. या पत्राचा सरासरी वेग हा 320  km प्रति तास इतका असतो. नॅशनल जिओग्राफिक टीव्ही कार्यक्रमानुसार या पक्षाचा जास्तीत जास्त वेग हा ताशी 390 किलोमीटर इतका नोंदवण्यात आला आहे. जेव्हा हा पक्षी सरळ रेषेत उडतो तेव्हा त्याचा सामान्य वेग 40 ते 55 किलोमीटर प्रतितास असतो.  शिकार शोधताना हा पक्षी 112 km प्रति तास वेगाने उडतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KNOWLEDGE HUB (@knowledgehub403)

पेरेग्रिन फाल्कन आकाराने कावळ्या इतकाच लहान आहे. या पक्षाच्या शरीराचा पुढचा भाग पांढरा असतो. तर, मागचा भाग निळा आणि राखाडी असतो. तर, याचे डोके काळ्या रंगाचे असते. काही ठिकाणी स्थानिक भाषेत या पक्षाला डक हॉक असेही म्हणतात. या पक्षाचा सर्वसामान्य आकार हा 13 ते 23 इंच इतका लांब असतो. जेव्हा हा पक्षी पंख पसरतो तेव्हा त्याचे पंखांचा विस्तार  29 ते 47 इंचापर्यंत आहे.मादी पेरेग्रीन फाल्कन नरापेक्षा आकाराने मोठा असतो. मादीच्या शरीराचा आकार पुरुषापेक्षा 30 टक्के मोठा असतो. नर पेरेग्रीनचे वजन एक किलोग्रॅम असते. तर मादीचे वजन जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत असते. पेरेग्रिन फाल्कन या पक्षाचा सामावेश Cosmopolitan Bird of Prey म्हणजेच Raptor या श्रेणीत करण्यात आला आहे. पेरेग्रिन फाल्कन हे पक्षी हवेत उडत असतानाच शिकार करतात. या पक्षाच्या 17 ते 19 प्रजाती अस्तित्वात आहेत.