आलिशान कारमध्ये गाय, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालकाने सांगितली धक्कादायक बाब

विस्कॉन्सिनमधील (Wisconsin) एका महिलेला कारमध्ये गाय (Cow in Car)बसलेली पाहून धक्का बसला. क्षणभर...

Updated: Sep 3, 2021, 01:00 PM IST
आलिशान कारमध्ये गाय, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालकाने सांगितली धक्कादायक बाब  title=
Pic Courtesy: New York Post

मार्शफील्ड : विस्कॉन्सिनमधील (Wisconsin) एका महिलेला कारमध्ये गाय (Cow in Car)बसलेली पाहून धक्का बसला. क्षणभर तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. गाडीतील गाय बनावट आहे. तथापि, काही क्षणांनंतर, तिचे दोन्ही अंदाज चुकीचे ठरले. कारण गाय प्रत्यक्षात कारच्या मागच्या सीटवर बसली होती. या महिलेने याचा एक व्हिडिओ शेअर केला. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (cow sitting on backseat of buick sedan car)

दरम्यान, याआधी भारतात (पाटणा, बिहार) वातानुकुलित रेल्वेतून म्हैशी नेण्यात आल्या होत्या. बरेचवेळा जनावरांची वाहतूक ट्रक किंवा टेम्पो सारख्या मोठ्या वाहनातून केली जाते. मात्र, कारमधून प्रथमच अशी वाहतूक करण्यात आल्याचे पुढे आले आहे. बरेच वेळा काही लोक लाडके पेट (श्वान) कारमधून नेताना दिसतात. गाय नेण्याची ही दुर्मिळ घटना आहे. 

गाय मागच्या सीटवर 

मात्र, हफपोस्टच्या म्हणण्यानुसार, मार्शफिल्डमधील मॅकडोनाल्डच्या बाहेर मोसिनीची रहिवासी जेसिका नेल्सनला तिच्या समोरून एक लक्झरी कार ब्यूक (Buick) जात होती. या कारच्या मागच्या सीटवर (Backseat)बसलेली गाय दिसली. नेल्सन सांगतात, 'आधी मला वाटले की ही गाय बनावट आहे. कारण, कोण गायीला Buick सारख्या प्रीमियम कारमध्ये ठेवेल. मात्र, मी पाहिले की ती आपली मान हलवत होती. त्यानंतर मी लगेच मोबाईलवरून त्याचा व्हिडिओ बनवला. ' लाखो लोकांनी हा व्हिडिओ काही वेळातच पाहिला.

गायीच्या मालकाने सांगितले कारण.. 

नेल्सनची पोस्ट व्हायरल होताच गाय आणि कारच्या मालकापर्यंत पोहोचली. यानंतर मालकाच्या कुटुंबाने त्याच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, हे गायीचे वासरू आहे. एवढेच नाही तर त्याने आणखी 2 बछडे असल्याचे सांगितले, जे नेल्सनच्या लक्षात आले नाही. तिची नजर त्यावर गेली नाही.