मुंबई : आपण हे नेहमीच म्हणतो की, मला नशीबानं साथ दिली नाही किंवा आज माझं नशीब चांगलं नव्हतं म्हणून घे होऊ शकलं नाही. म्हणजेच काय तर नशाबानं साथ दिली तर आपण काहीही करु शकतो. नशीब चांगलं असेल, तर माणूस रस्त्यावरुन महालात पोहोचतो, तर एखाद्याचं नशीब खराब असेल, तर राज्याचा रंक होतो.
अशीचं काहीसा नशीबाचा खेळ एका माणसा सोबत घडला आहे. या माणसाचं नशीब इतकं चांगलं होतं की, त्याने आधी दोनदा दहा लाखांची लॉटरी जिंकली, त्यानंतर त्याने आता परत 100,000 ची लॉटरी जिंकली गेली.
अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनामध्ये एका व्यक्तीचे नशीब असे चमकले की, त्याने एक किंवा दोन नव्हे तर चक्क तीन वेळा लॉटरी जिंकली आहे.
एका मीडीयावृतानुसार, उत्तर कॅरोलिनामधील एका व्यक्तीने तिसऱ्यांदा लॉटरीचे तिकीट जिंकले. दोनदा दहा लाख जिंकल्यानंतर, तिसऱ्यांदा त्याला 100,000 चा जॅकपॉट लागला आहे.
कॉनकॉर्डच्या टेरी स्प्लानने उत्तर कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, सोमवारी कॉनकॉर्डमधील सॅमच्या मिनी स्टॉपवर तो आला जेव्हा त्याने $ 20 चे प्रीमियर कॅश स्क्रॅच-ऑफ तिकीट विकत घेतले, ज्यामुळे त्याला $ 100,000 बक्षीस मिळाले.
स्प्लॉन असे त्या व्यक्तीचे नाव आहे, तो एप्रिल 2017 मध्ये लॉटरी मुख्यालयात गेला, तेव्हा त्याने पहिल्यांदा $ 1 दशलक्ष जिंकले. दोन वर्षांनंतर, मार्च 2019 मध्ये, $ 150 दशलक्ष कॅश तो जिंकला. त्यानंतर आता त्याने चक्कं तिसऱ्यांदा 100,000 चा जॅकपॉट जिंकला आहे.
यात मुख्य गोष्टं आशी की, स्प्लॉनने या तीनही लॉटरीच्या तिकीत एकाच दुकानातुन घेतलेल्या आहेत. आता त्या व्यक्तीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. लॉटरी खेळण्याच्या सवयीने या व्यक्तीला तीनदा श्रीमंत केले आहे.