या मॉडेलशी मुली मैत्री करत नाहीत, कारण ऐकाल तर बसेल धक्का

मॉडेल मोरया मिल्सची एक पण मुलगी मैत्रीण नाही. फक्त मुलंच तिच्यासोबत मैत्री करतात.

Updated: Sep 8, 2021, 01:10 PM IST
या मॉडेलशी मुली मैत्री करत नाहीत, कारण ऐकाल तर बसेल धक्का title=

अलबॅनी : न्यूयॉर्कस्थित महिला मोरया मिल्स (Moriah Mills) ही एक मॉडेल आणि ती खूप सुंदर आहे. ती तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीत खूप यशस्वी आहे. ज्यामुळे तिचे अनेक चाहते आहेत. बऱ्याचदा आपण म्हणतो की, सेलेब्रिटी लोकांचे अनेक मित्र मैत्रिणी असतात. त्यांना मित्रांची कमी नसते. परंतु मॉडेल मोरया मिल्सची कहाणी काही वेगळीच आहे. जे ऐकल्यावर तुम्हाला विचित्र वाटेल पण हे खरं आहे.

मॉडेल मोरया मिल्सची एक पण मुलगी मैत्रीण नाही. फक्त मुलंच तिच्यासोबत मैत्री करतात. मॉडेल मोरिया (Moriah Mills) म्हणते की, मुलींना माझ्याशी मैत्री करायची नाही. मोरिया म्हणते ती, "मी इतकी सुंदर आहेत की, मुली माझ्याशी मैत्री करायला घाबरतात."

द सनच्या रिपोर्टनुसार, 27 वर्षीय मॉडेल मोरिया (Moriah Mills) म्हणते की, मुली तिच्याशी मैत्री करत नाहीत कारण त्यामुलींच्या जोडीदाराला किंवा बॉयफ्रेंडला मोरियाला डेट करायचे असते. मोरियाशी मैत्री असल्याने तिच्या मैत्रीणींच्या बॉयफ्रेंडला मोरियाशी ओळख करणे सोपे जाते आणि ते तिच्या मागे फिरतात. तिच्या मैत्रिणींना अनेकदा भीती वाटते की, जर त्यांनी मोरियाशी मैत्री केली, तर ते आपला जोडीदार गमावतील.

मोरिया सांगते की, मला आता या सगळ्याची सवय झाली आहे. त्यामुळे मी आता यासगळ्याचा विचार करणं सोडून दिलं आहे. आता मी फक्त स्वतःवर प्रेम करते.

मोरियाचे (Moriah Mills) इन्स्टाग्रामवर 100k फॉलोअर्स आहेत. तिच्या आयुष्याबद्दल सांगताना तिने आपल्या फॉलोअर्सना सांगितले, 'मुलींच्या नवऱ्यांना आणि बॉयफ्रेंडला मी आवजते. मी खूप चांगली आहे पण कदाचित लोकांना असे वाटते की, मी गर्विष्ठ आहे आणि माझ्या सौंदर्यामुळे त्यांना असे वाटते. तर प्रत्यक्षात मी खूप नम्र आणि जमिनीशी जोडली गेली आहे.

शालेय काळात खूप लाजाळू असलेल्या मोरियाने (Moriah Mills) नेहमीच स्वतःला स्वतःपुरतेच मर्यादित ठेवले. तथापि, आता ती लोकांवर विश्वास ठेवायला शिकत आहे, त्यामुळे तिला आशा आहे की, ती लवकरच मैत्री करेल. मॉडेलिंग व्यतिरिक्त, मोरिया गाते देखील. ती रॅप देखील करते. ती म्हणते मी एकटी आहे पण आनंदी आहे. मला पुरुष चाहत्यांची कमतरता नाही.