6 मुलांची आई 8 व्यांदा प्रेग्नेंट, लोकांच्या प्रश्नांना कंटाळली म्हणाली...

ही महिला त्रस्त आहे ते लोकांमुळे आणि तिला वारंवार विचारलेल्या प्रश्नांमुळे.

Updated: Sep 29, 2021, 02:20 PM IST
6 मुलांची आई 8 व्यांदा प्रेग्नेंट, लोकांच्या प्रश्नांना कंटाळली म्हणाली... title=

लंडन : जेव्हा कोणतीही स्त्री गर्भवती असते, तेव्हा ती खूप आनंदी असते, लोक तिचे अभिनंदन करतात. पण एक आई एका विचित्र समस्येने त्रस्त आहे. या महिलेला 6 मुले आहेत आणि ती 8 व्या वेळी गर्भवती आहे. हे जाणून घेतल्यावर, तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की ती तिच्या मुलांमुळे किंवा गर्भधारणेमुळे अस्वस्थ असेल. पण ते तसे नाही, या महिलालेच्या बाबतीत काही वेगळच घडलं आहे.

ही महिला त्रस्त आहे ते लोकांमुळे आणि तिला वारंवार विचारलेल्या प्रश्नांमुळे. या महिलेला लोकांकडून तिच्या गर्भधारणेवर वारंवार प्रश्न विचारले जात आहेत.

पादरी मायकलची पत्नी एरियल अमेरिकेत चर्चेचा विषय बनली आहे. ती 6 मुलांची आई आहे. त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. सध्या ती 8 व्या वेळेस गर्भवती आहे आणि तिला आशा आहे की यावेळी तिला मुलगी होईल. तिने सोशल मीडियावरती तिचे कुटुंब, मुलं आणि गर्भधारणेचे अनेक फोटो आणि माहिती शेअर करत असते. 

यामुळे, तिचे टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि ती प्रसिद्ध देखील आहे, त्यामुळे साहजिकच लोक तिला अनेक प्रश्न विचारत असतील. पण आजकाल ती सर्वात जास्त चिंतेत आहे की लोक तिला पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारत आहेत. लोकं तिला विचारताता एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च ती कशी उचलते?

'द सन' च्या अहवालानुसार, एरियल म्हणते, 'लोक आम्हाला पुन्हा पुन्हा विचारतात की आम्ही इतक्या मुलांचा खर्च कसा उचलतो? या व्यतिरिक्त, ते हे देखील विचारतात की आमचे पुढील मुल मुलगी असेल का? मुलगी नसल्यास, आम्ही निराश होऊ का? मी त्या सर्वांना सांगतले आहे की मुलगा असो किंवा मुलगी, आम्ही त्याचे आनंदाने स्वागत करू."

परंतु वारंवार सांगुन सुद्धा लोकांकडून तिला तिच तेच प्रश्न विचारले जात आहेत, ज्यामुळे ती त्रस्त आहे. या कुटुंबाने टेनेसीमध्ये राहायला सुरुवात केली आहे, जिथे त्यांनी अलीकडेच त्यांच्या घराचे नूतनीकरण केले आहे.