बॅायफ्रेंडच्या मृतदेहापासून महिला गरोदर... काय आहे संपूर्ण प्रकरण

हिवाळी ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिनच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड एलीडे व्लुगने मूल होण्याची इच्छा

Updated: Jun 29, 2021, 08:31 PM IST
बॅायफ्रेंडच्या मृतदेहापासून महिला गरोदर... काय आहे संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : दोनदा वर्ल्ड स्नोबोर्ड चॅम्पियनशिप जिंकणारा हिवाळी ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिनचा (Winter Olympian Alex Pullin) गेल्या जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टवर स्पीयरफिशिंग करताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या आधी तो आठ वर्षांपासून त्याची मैत्रिणी एलीडे व्लुग (Ellidy Vlug) बरोबर राहत होता. बॅयफ्रंडच्या मृत्यूनंतर एलीडेने ती गर्भवती असल्याचा दावा केला आहे.

हिवाळी ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिनच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड एलीडे व्लुगने मूल होण्याची इच्छा व्यक्त करत डॉक्टरांना अ‍ॅलेक्सच्या शरीरातून शुक्राणू काढण्यास सांगितले आणि त्यानंतर एका वर्षानंतर तिने तिच्या आणि अ‍ॅलेक्स पुलिनच्या मुलाला जन्म देणार असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, एलीडे व्लुग (Ellidy Vlug) ने जाहीर केले की,  ती ऑक्टोबरमध्ये प्रसूतीसाठी येणार आहे. त्यानंतर तिने तिच्या बेबी बंपसोबतही आपले फोटो शेअर केले.  हे जोडपे अनेक वर्षांपासून बाळाचे स्वप्न पाहत होते.

एका वृत्तानुसार, सन 2020 मध्ये ऑलिम्पियन अ‍ॅलेक्स पुलिन यांचा अपघातात मृत्यू झाला. ज्यानंतर त्याच्या प्रेयसीने अ‍ॅलेक्सच्या मृत्यूनंतर 24 तासांत डॉक्टरांना सांगून त्याचे शुक्राणू  (sperm) गोळा केले आणि आता ती अ‍ॅलेक्सच्या मुलाची आई होणार आहे.

एलीडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट तिच्या गरोदर राहण्याबद्दल सांगितले की, 'आमचे बाळ ऑक्टोबरमध्ये येणार आहे. मी आणि अलेक्स गेल्या काही वर्षांपासून बाळासाठी तयारी करत होतो. माझ्यासाठी हा एक अतिशय आव्हानात्मक टप्पा होता. परंतु आता मी यातून सावरत आहे.' तिने पुढे सांगितले की, अ‍ॅलेक्सच्या मृत्यूआधी मी गरोदर राहावे अशी आमची इच्छा होती. बर्‍याच दिवसांपासून आम्ही बाळाचे प्लॅनींग करत होतो. त्यासाठी आम्ही आयव्हीएफ तंत्राचाही विचार करत होतो.

एलीडेने पुढे लिहिलं आहे की, 'मला अ‍ॅलेक्सची खूप आठवण येते, पण आता माझ्याकडे त्याची आठवण म्हणून त्याचे बाळ माझ्याकडे आहे. ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. आम्ही असा विचार केला नाही की, असे होईल. गेल्या एका वर्षात माझ्याबरोबर जे काही घडले, मला अजूनही त्यावर विश्वास बसत नाही.'