लाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि...

crab bite girl : मुलीला खेकडा चावला आणि बापाचा राग अनावर झाला. त्यानंतर बापाने तोच जिवंत खेकडा तोंडात टाकाला....

Updated: Nov 2, 2022, 11:51 AM IST
लाडक्या लेकीला खेकडा चावला, बापाने जिवंतच तोंडात टाकला आणि... title=

Father eat crab alive after bite his daughter : आपल्या मुलाला किंवा मुलीला त्रास झाला तर आई-वडिलां खूप दु:ख होते. त्यांच्या रागाचा पार चांगलाच चढतो. मात्र, इथं लाडक्या लेकीला त्रास दिला तो एका खेकड्याने. मुलीला खेकडा चावला. त्यानंतर मुलगी ओरडून रडू लागली. बापाला काही समजेना. त्यांनी मुलीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना खेकडा मुलीला चावल्याचे दिसले. रागाच्या भरात बापाने जिवंतच खेकडा तोंडात टाकला आणि कराकरा चावून खाल्ला. त्यानंतर असं काही होईलं असं त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल.

खेडका खायला कोणालाही आवडतं. खेकडा म्हटल्यानंतर कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटतं. शिजवलेला खेडका खाण्यास चविष्ट असतो. मात्र, इथं तर जिवंत खेकडा खाल्ला गेला. खेकड्याला जिवंत पकडतानाही त्याची नांगी भयानक असते. नांगीने डंख भयानक असतो. असा खेकडा जिवंत खाल्ला तर काय होईल, याची कल्पनाच नकोच. 

मुलीला खेकड्याने चावल्याची घटना चीनमधील आहे. मात्र, चीनमध्ये जिवंत प्राणी खाणं हे नवीन नाही. पण मुलीच्या वडिलांनी आवड म्हणून नव्हे तर रागाच्या भरात जिवंत खेकडा खाल्ला. त्यांच्या मुलीला खेकडा चावला. त्यानंतर या व्यक्तीने त्याच खेकड्याला जिवंत कराकरा चावून खाल्ले. पण त्याचा हा बदला मुलीच्या वडिलांनाच चांगलाच महागात पडला. जिवंत खेकडा खाल्ल्यानंतर त्यांची अवस्था वाईट झाली. ते गंभीर आजारी पडलेत.

साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार 39 वर्षांच्या लू नावाच्या व्यक्तीने एक छोटा खेकडा जिवंत खाल्ला. दोन महिन्यांनंतर त्यांच्या पाठीत वेदना होऊ लागल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मेडिकल रिपोर्टनुसार, त्याची छाती, पोट, यकृत आणि पचन प्रणालीत बदल दिसून आला. पण हे असं कसं झालं याचं कोडं डॉक्टरांना उलगडेना. डॉक्टरांनी अधिक माहिती विचारली तेव्हा उलगडा झाला. त्यांनी जिवंत खेकडा खाल्ला होता.

 रुग्णालयातील पचन तंत्र विभागातील डॉ. काओ किआन यांनी सांगितले, रुग्णालयात दाखल केलेल्या मुलीच्या वडिलांना काहीही सांगितले नाही. मात्र त्यांच्या पत्नीने जे काही घडलं ते सांगितले.  ते पाण्यातून जात होते तेव्हा त्याच्या मुलीला एक छोटा खेकडा चावला. त्यामुळे त्याला राग आला आणि त्यांनी तो जिवंत खेकडा खाल्ला. याची कबुली त्यांनीही दिली.

त्या मुलीच्या वडिलांच्या रक्त तपासणीनुसार त्यांना तीन संसर्ग झाल्याचे निदान झाले. कच्चे मांस खाल्ल्याने हे संक्रमण होते. सुदैवाने या व्यक्तीला तसे काही झालं नाही. परंतु डॉक्टरांनी जिवंत खेकडा खाण्यापासून सावध राहण्यास सांगितले.