Viral News: तरुणाने दिलेल्या सल्ल्याने एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्थ झालं. गेल्या काही दिवसांपासून तरुणाच्या गुप्तांगात वेदना होत होत्या. वेदना असहाय्य झाल्यानंतर त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि इथेच त्याचा निर्णय चुकला. डॉक्टरांनी अनेक तपासण्या (Test) केल्या आणि त्या व्यक्तीला गुप्तांगात ट्यूमर (Tumor) असल्याचं निदान केलं. डॉक्टरांनी केलेल्या निदानानंतर रुग्ण प्रचंड घाबरला. गुप्तांगात ट्यूमर असून शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. पण डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला व्यक्तीला चांगलाच महागात पडला.
काय झालं नेमकं?
डॉक्टरांनी गुप्तांगात ट्यूमर असल्याचं सांगत ट्यूमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागले, त्यानंतरच वेदना दूर होतील असं रुग्णाला सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार झाला. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर कळलं की असाही काही ट्यूमर नव्हताच. पण तोपर्यंत तरुणाला मोठी किंमत चुकवावी लागली होती.
इटलीत राहाणाऱ्या या व्यक्तीला गुप्तांगात वेदना जाणवत होत्या. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला. अनेक तपासण्या झाल्या, त्यानंतर डॉक्टरने गुप्तांगात ट्यूमर झाल्याचं सांगत शस्त्रक्रियेनंतर ट्यूमर काढता येऊ शकतो असं सांगितलं. डॉक्टरांनी सर्जरी केल्यानंतर कळलं की त्या व्यक्तीला ट्यूमर झालाच नव्हता.
रुग्णान घेतली कोर्टात धाव
60 वर्षांच्या या व्यक्तीला सिफलिस नावाचा आजार झाला होता. केवळ औषधोपचार करुन यावर इलाज करणं शक्य होतं. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्या व्यक्तीला गुप्तांग गमवावं लागलं. या घटनेचे इटलीत चांगलीच पडसाद उमटले असून आरोग्य विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तसंच त्या व्यक्तीने कोर्टात धाव घेतली आहे. डॉक्टरला कठोर शिक्षेबरोबरच आर्थिक मानहनीचा दावा त्या व्यक्तीने ठोकला आहे.
याआधी सुद्धा अशीच घटना घडली होती
ही पहिलीच घटना नाहीए, गेल्या वर्षी यूरोपमध्ये सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. फ्रान्कमध्ये एका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचं गुप्तांग काढून टाकण्यात आलं. रुग्णाचाया शस्त्रक्रियेला विरोध होता, पण डॉक्टरने स्वत:च्या मर्जीने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्या तरुणाने केला. यानंतर त्या तरुणानेही कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात या तरुणाने 10 लाख यूरो देण्याची मागणी केली. संपूर्ण तपासानंतर कोर्टाने डॉक्टरला दोषी ठरवत 62 हजार युरो देण्याचे आदेश दिले.
कॅन्सरची लक्षणं काय?
सध्याची व्यस्त जीवनशैली, आहाराच्या अनियमित वेळा यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चाललेय. काही आजार असे असतात ज्यांचं निदान खूप उशिराने होतं. कॅन्सर हा असाच आजार आहे. ज्याची प्राथमिक लक्षणे तितकीशी आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी अथवा तिसरी स्टेज गाठलेली असते आणि तो पर्यत उपचाराची योग्य वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे काही लक्षण तुम्ही घरातचं ओळखू शकता आणि या लक्षणांना दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांकडून उपचार करु शकता.