Video Octopus Destroying Car: सोशल मीडियावर अनेकदा वन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा हे व्हिडीओ कधी जंगलीमधील शिकरीचे असतात. मात्र त्यातही जलचर प्राण्यांचे व्हिडीओ खरोखरच सर्वांनाच थक्क करणारे असतात. खरं तर पाण्यात खोलवर राहणारे मासे आणि प्राण्यांबद्दल अनेकांना विशेष आकर्षण असतं. या प्राण्यांबद्दलचं रहस्य आणि गूढ याबद्दल अनेकांना बरीच उत्सुकता असल्याने हे व्हिडीओही चांगलेच व्हायरल होतात. अशाच रहस्यमयी प्राण्यांपैकी एक म्हणजे ऑक्टोपस. ऑक्टोपसबद्दलची माहिती आपल्यापैकी अनेकांनी डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफीसारख्या माहितीपर वाहिन्यांवर पाहिली असेल. अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्येही तुम्ही या समुद्रातील दानव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्याबद्दलची माहिती पाहिली असेल. सोशलम मीडियावर सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक ऑक्टोपस चक्क एका कार पार्किंगमध्ये आढळून आल्याचं दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ केवळ 17 सेकंदांचा असून त्याला 82 लाखांहूनही अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. पार्किंग लॉटमध्ये एक ऑक्टोपस एका कारच्या बोनेटवरुन कारवर चढताना दिसतो. हा ऑक्टोपस कारवच्या विंडशिल्डवर गेल्यानंतर अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यावर दाब देतो की कारच्या काचांचे तुकडे तुकडे होऊन मोठा आवाज होतो. या संपूर्ण काळात कारचा अॅण्टी थेफ्ट अलार्म वाजत असतो. हा ऑक्टोपस आधी जमिनीवरुन आपल्या 8 पायांच्या मदतीने गाडीच्या बोनेटवरुन काचेवर चढतो. 'अशा प्रसंगी तुम्ही काय केलं असतं?' अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ गॅन्स अॅण्ड रोजेस गर्ल थ्री नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
What would you do in this situation?
pic.twitter.com/ACqpE2Rrzp— Science girl (@gunsnrosesgirl3) October 26, 2023
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कमेंट्स केल्या असून हा व्हिडीओ फारच धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. एकाने हा व्हिडीओ पाहून ऑक्टोपसला समुद्रातील राक्षस का म्हणतात हे समजलं असं म्हटलं आहे. मात्र काहींनी हा व्हिडीओ अनेकांनी एडीटेट असल्याचं म्हटलं आहे. खास करुन ज्या पद्धतीने हा ऑक्टोपस काचेवर गेल्यानंतर जसा जोर लावतो आणि काचांचे तुकडे बाहेरच्या बाजूला उडतात ते पाहून अनेकांनी हा पूर्णपणे एडीटेड असल्याचं म्हटलं आहे.
मागील 15 दिवसांपासून हा व्हिडीओ कतारमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अनेक फॅक्ट चेक वेबसाईटने हा व्हिडीओ सीजीआय म्हणजेच कंप्युटर जनरेटेड ग्राफिक्स असल्याचं म्हटलं आहे.