Video : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक  Nude दिसतं आहेत.   

Updated: Nov 27, 2022, 01:27 PM IST
Video : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का title=
video 2500 people became nude on beach and Awareness For Skin Cancer viral on social media nmp

Awareness For Skin Cancer Video : सोशल मीडिया (Social media) हे अनेक व्हिडिओचा (Video) खजिना आहे. या खजिनात अजून एका धक्कादायक व्हिडिओची भर पडली आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. समुद्र किनाऱ्यावर 2500 लोक  एकत्र आली पण तिही Nude अवस्थेत दिसले. एवढी लोक एकत्र आणि तिही Nude पण का असा प्रश्न नेटकरी विचार आहेत. 

जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम (awareness Video)

आपण आंदोलन आणि जनजागृतीसाठी अनेक संदेश देणारे उपक्रम, रॅली पाहिल्या आहेत. सध्या भारतात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Former Congress president Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) ची सोशल मीडियासोबत सगळीकडे चर्चा आहेत. अशातच एक विचित्र उपक्रमाचा व्हिडिओ जगभरात धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये जगाला संदेश देण्यासाठी 2500 लोक Nude झाले.  20 ते 26 नोव्हेंबर हा आठवडा National Skin Cancer Action Week म्हणून पाळला जातो. या आठवड्यात स्किन कॅन्सरबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात येतो. 

कुठे करण्यात आला हा उपक्रम

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) बोंडी बीचवर (Bondi Beach) पहाटेच्या वेळी 2,500 स्वयंसेवक एकत्र येतं त्वचेच्या कर्करोगाबाबत (Skin Cancer) जनजागृती करतात. यासाठी ते अनोख्या पद्धतीने म्हणजे अंगावर एकही वस्त्र न घालता समुद्रकिनाऱ्यावर एक कलाकृती तयार करतात. 

या संकल्पना अमेरिकन फोटोग्राफर स्पेंसर ट्यूनिक (American photographer Spencer Tunick) यांनी तयार केली आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, ऑस्ट्रेलियातील लोकांनी नियमित अंतराने स्किन कॅन्सरची तपासणी करावी. या उपक्रमात पुरुषांसोबत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.